S1 E183 1st Aug Swami bhaktano namaskar
नाऱ्या आणि भीम्या बघतात कि स्वामी कडे भरपूर गर्दी वादळी आहे . भीम्या भाऊ : "नाऱ्या आरा स्वामींनि फकस्त डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद भी दिला नाही तरी ह्यो माणूस एवढा का आनंदी झ्हाला रा " नाऱ्या भाऊ : "भीम्या:,स्वामींनी डोक्यावर हात ठेवल्याकी ,समाधान मिळत ,सगळ्या समस्या दूर होतात,सगळं काही ठीक होता असा धीर येत असेल ह्याला ".
भीम्या भाऊ स्वामींचा आशीर्वाद घेतात .स्वामीं :"तू फक्त आम्हाला फुलं अर्पण कर बाकी आम्ही ठरवू काय करायच तें "
दुसरीकडे दाजीबा सरकार चिडून बसलेत. एक शिपाई येतो दाजीबा त्याला चाबकाचा फटका देतात्त. तो म्हणतो :"सरकार राधा बाई गावात आली " दाजीबा त्याला बक्षीस देतात .दाजीबा :"रंगमहाल सजवायला कळवा "
राधा नृत्य करायला सुरवात करते . पण दाजीबाचं लक्ष्य नसतं . राधा :"सरकार आमचा काही चुकला होय ,तुमचा लक्ष्य नाही आमच्याकडे ,तुमच्या मनात काही चाललंय होय ,सांगा कि राधाला " दाजीबा:"कसा आहे राधा या अक्कलकोटचे फक्त आणि फाफक्त आम्ही राजे आहोत ,पण आमची पकड आता ढिली होत चाली आहे " राधा :"का ?" दाजीबा :"बुवा ,... एक बुवा हाय संध्यासनी नदी लावलाय त्यांना कोण कुठचा बुवा , डोक्यावर ठेऊन नाचतात त्याला ,जादू टोना करतो तो ,जो येतो तो बुवाचंच नामस्मरण करतो ,देव म्हणतात त्याला " राधा :"काय सरकार तुम्ही ,हे बुवा फक्त नामाचेच असतात ,एकदा का राधाचा घुंगरू चा आवाज आला ना ,कि ताळ चिपळ्यांचा आवाज कोणाला ऐकू येणार आहे. अहो मी राधा .राधा जशी ५२ कशी. ह्या राधाच्या ५२ कशी सोंदर्या पुढं त्या बुवाची जादू फ्हूस. सरकार ह्या बुवाना अख्या गावाला भक्ती मार्गाला लावला ना ,आता हि राधा त्याच गावाला तिच्या तालावर नाचते का नाही ते बघाच . सरकार तुमची या राधाचा फड गावात ठेवा ,मग बघा ही राधा कशी जादू करते ती,नाही ह्या गावाला दारू आणि लावणीच्या कैफात फसवलं ना तर हि राधा नाव नाही सांगणार. सरकार तुमची दहशत परत येणार आणि आखा गाव त्या बुवाला सोडून तुमच्या पायाशी येणार ,अहो हे जबान आहे राधाची "
दुसरीकडे स्वामी हसत असतात . रामाचार्य पण चिडलेत. रामाचार्य :"तू दुर हो ,तू त्या बुवाला भजतेस त्या मुळे माझी ताई पण त्या बुवाच्या नदी लागली आहॆ ".
तिथे स्वामी येतात :"खबरदार तिला काही म्हणालास तर, अरे ती आमच्या नादाला लागली आहे कारण तिचा उधार लवकर आहे ,तुझ्या उद्धाराला अजून वेळ आहे पण तुही लागशील .एकूणच काय तर सगळ्यांनाच आमच्या नादी लागायचा .,शिव हरी शशांकर नमामि शंकर शिव शंकर शंभो ".
दुसरीकडे देवयानी :"सरकार हि राधा कोण आहे " दाजीबा :"आम्हाला नाही माहित " देवयानी:"अहो आपल्या वाड्यातील एक दासी आहे ना ती सांगत होती "
दाजीबा :"काय,काय सांगत होती ?" देवयानी:"तिच्या नवऱ्याने म्हणे त्या राधाला पाह्यलंय ,ती खूपच रूपवान आहे म्हणे आणि तिचा नवरा राधाचा कौतुक करताना थांबतच नव्हता ,खुलं लागल्यासारखा बोलत होता. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं ,कोण आहे हि राधा ? " दाजीबा :"असेल कोणी कलावंत वैगेरे ,असेल " देवयानी :"तुम्ही पाहलय का तिला ?" दाजीबा:"चे चे अजिबात नाही ,आणि खरा सांगू का राणी सरकार जर चुकून लक्ष्य गेला तरी आम्हाला कोणी भुरळ घालू शकत नाही राणी सरकार ,कारण ह्या जगात सगळ्यात सुंदर तुम्ही आहात आमच्या साठी " तिथे चंदा दूध केशर आणते .. दाजीबा :"उत्तम " दाजीबा :"काय ग ए दूध गरम नाहीया ना ? परत हात पोळ्याचा आमचा नाहीतर .,खरा सांगू का राणी सरकार या दुधाची खरी गरज तुम्हाला आहे. तुमचा चेहरा अजून तजेलदार व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला होतं पंजर आहोत हे दूध " देवयानी :"सरकार काहीतरीच तुमचा ,चन्दा उद्या पळायला जायचा आहे तयारी करायला हवी ,आम्ही आलोच ये तू ". दाजीबा देवयानी च्या नकळत दुधात काहीतरी मिसळतात आणि तेच दूध देवयानी ला पाजतात.
एक व्यक्ती राधा चा नृत्य पाहायला चोळप्पा ना निमंत्रण देतात. तिथे स्वामी येतात. भीम्या भाऊ स्वामींना फुलं अर्पण करतात .स्वामी:"हंम किसीसे बात नाही करेंगे हमे एकांत चाहिये " स्वामी का चिडलेत ?पाहूया पुढच्या भागात श्री स्वामी समर्थ
No comments:
Post a Comment