1. स्वामी कडून मातीची ढेकळं घेतलेला माणूस विचार करत असतो :"उगाचच मी इथे आलो " त्या व्यक्तीला ती पिशवी जाड वाटत असते . ती व्यक्ती पिशवी उगडून बघतो तर तिथे त्या मातीच्या ढेकळांचा चांदी झाली असती . ती व्यक्ती :"मातीची चांदी झाली ,स्वामी " असे ओरडत परत स्वामीं कडे येऊन :"स्वामी आपली लीला अतर्क्य आहे , आपण मला जी माती दिली त्याची चांदी झाली ,या पामरास एका फटक्यात सर्वकाही दिला ,मी या ऋणातून कसा उतराई होऊ "
स्वामी :"आता सरळ घरी जायचा ,अरे कर्ज झाला म्हणून तीर्थयात्रेला निघून गेलास , स्वतः पळून गेलास मोकळा झालास ,पण कुटुंबाचा विचार जराही शिवला नाही का रे तुझ्या मनाला , अरे संकट अली कि हाताला हात धरून त्यातयूनं बाहेर पडायचा असतं , फक्त एकट्याचा विचार करण स्वार्थीपणा चाल निघ आता " ती व्यक्ती :"क्षमा असावी स्वामी असा विचार पुन्हा मनाला शिवणार सुद्धा नाही " ती व्यक्ती स्वामींचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जाते . तेव्हा तेथे भीमा येतात ,पण भुजंग त्याला म्हणतात :"भीमा नको त्या लोकांसोबत फिरत असतो ." भीमा :"पण माझं स्वामींवर विश्वास आहे बघा " चोळप्पा:"भीमराव स्वामींना शरण गेलात ना तुमचा कल्याण निश्चित आहे ,फक्त स्वामींनी नेमून दिलेला काम हे मनापासून करा " भीमा खुश होतात आणि स्वामींना फुलं वाहतात . तिथे सुमुख येतो आणि दुसऱ्या दोन गावकर्यांना संध्याकाळी राधा च्या कार्यक्रमाला यायला सांगतो . ती दोन गावकरी दुसऱ्या गावकर्यांना पण सांगून घेऊन जात असतात .स्वामी :"रुक जाओ ,कुठे चाललात " तो गावकरी :"त्याने सांगितल्या मुळे " स्वामी :"चला आमच्या बरोबर " स्वामी सगळ्या गावकऱ्यांना गावाच्या वेशी बाहेर घेऊन जातात . नारसप्पा :"अयो स्वामी इथे काय आहे " चोळप्पा आणि भुजंग त्यांना थांबायला सांगतात . स्वामी :"शिव शंकर शंभो "असे म्हणताच सगळी घर जळत असतात .स्वामी :"बघा तुमचा अक्कललोट " सगळे गावकरी रडू लागतात .चोळप्पा :"भीमा भाऊ अहो असा काय असं काय करताय " भीमा :"अहो तुम्हाला दिसत नाही होय अहो माझा घर जाळायला लागलाय ,अहो सगळी राख संगोळी झाली " चोळप्पा ना मात्र असा काही दिसत नाही . चोळप्पा :"स्वामी हे काय लीला आहे ,ह्यां काय दिसत आहे " स्वामी :"हे आहे तुमच्या अक्कलकोटचं भविष्य ,जर त्या बाईच्या नदी लागला तर हे असच होईल ,जाळणारी घर पेटलेली प्रेतं ,आता तुम्ही ठरवा त्या बाईच्या नादी लागायचा का नाही " सगळेजण रडत :"क्षमा करा स्वामी आम्ही परत त्या तमाशाला जाणार नाही " स्वामी :"हा निर्णय अंतिम आहे " सगळे गावकरी :"होय स्वामी " स्वामी :"बरं जर तास असेल तर तुम्हाला त्या बाईच्या समोर तास बोलावा लागेल " गावकरी :"पण ते दाजीबा सरकार " स्वामी :"का...... ,? धीर खचला " गावकरी :"नाही स्वामी आम्ही सांगणार ,फकस्त तुम्ही आमच्या पाठीशी उभी राहावा " स्वामी :"प्रत्येक योग्य गोष्टीच्या पाठीशी आम्ही असतोच " सगळेजण स्वामींना नमस्कार करतात .
2. दुसरीकडे दाजीबा सरकारला येऊन सुमुख येऊन सांगतो कि :"सरकार ,त्यो बुवा संध्या लोकास्नी घेऊन कुठे तरी गेलाय ,तो बुवा जादू टोणा करतो " राधा :"अरे सगळ्या जादू टोण्याच्या वर ह्या राधाची जादू आहे ,आता दाखवतेच जादू " असे म्हणत राधा आत मध्ये जाते आणि पाहते तर तिथे कोणीच नसते . स्वामी तिथे येतात :"राधा बाई.... ,काय शोधतेस ? " राधा :"कुठं आहेस माझी माणसं , डांबून ठेवलास ना तू त्यांना ,कि जादू टोणा केलास त्यांच्यावर ,आरा गावातल्या लोकांना त्यांच्या मर्जी प्रमाणे वागू दे की तू कशाला अडवतोस " स्वामी :"आगा आम्ही कोणाला अडवत नाही कि कोणाला बांधून हि ठेवत नाही ,जे चांगल्या मानाने आमच्याकडे येतात त्या आपोआप आमच्याशी बांधले जातात ,या रे " सगळे गावकरी येतात "आम्ही आमच्या मर्जीने केले स्वामींना दोष देऊ नका " दाजीबा सरकार सुमुख आणि आचार्य पण येतात . स्वामी :"राधा बाई आगा नृत्य आणि संगीत हे दैव्यि देणगी आहे , आमचा ठाकूरदास,त्याच्याकडे बघ , त्याला पण सरस्वती प्रसन्न आहे ,पण तो त्याचा उपयोग कीर्तनासाठी करतो ,लोकांना उपदेश देण्याकरिता करतो त्यांना देव समजावा म्हणून करतो ,आगा ह्यांना उपरती झालीय, तुला कधी होणार ?,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " राधा तिथून निघून जाते . सगळेजण स्वामींना नमस्कर करतात
No comments:
Post a Comment