Avoid Copy Paste

Monday, 23 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 204 "स्वामींनी रंगवलेलं मडकं जमिनीत पुरलं"



1. चंदा पाड्यामागून लपून बघत असते . दाजीबा कालिंदी ला हळूच :"ऐकते आहे ती " त्यावर कालिंदी नाटक करू लागते :"सरकार ,चंदा ची तिच्या संख्या आई पेक्षाही जास्त काळजी घेईन " दाजीबा :"कसा आहे कालिंदी बाई आमच्या राणी सरकार तुमच्या चंदाला सख्या बहिणीसारखा मानतात ,आता तुमची चंदा खुश तर आमचे राणी सरकार खुश ,म्हणून हा सगळा आटापिटा "  सगळेजण हसू लागतात . 

2.दुसरीकडे स्वामी पण हसत असतात . स्वामी :"एक चेहरे पर कितने चेहेरे लागते है लोग ,पण आमच्यापासून काहीही लपलेले नाही " स्वामींचे पाय दाबत भुजंगा :"बरोबर आहे स्वामी ,पण कोण बद्दल बोलत आहेत तुम्ही " स्वामी चिडून :"एका वेळेला एक काम कर , आमच्या डोक्यावरचा भर तू घेऊ नकोस ,सांगू कधीतरी चल " भुजंगा:"ते लोक आले आहते भेटायला ,एक आजोबा पण आलेत ,भेटू द्यायचा का?" स्वामी :"आने  दो "  आजोबा :"स्वामी , मला काही नको ,पण मरण्या आधी गॉड धोड खाण्याची इच्छा आहे   " स्वामी :"बरं आज तुला श्रीखंड पोळी खाऊ घालतो ,जा बस तिथे " तिथे राधा बाई जिजा ला घेऊन येतात .जिजा खुश होते आणि "देव बाप्पा " अशी म्हणते . आणि स्वामी च्या जवळ बसते . राधा :"मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते , मी लै चुकीचे वागले ,आता स्वामी माज्यासाठी देवा प्रमाणेच आहे , माझी जिजा तर त्यांना देवबाप्पाच म्हणते ,हि जिजा माझी बहीण ,ह्याच्या आधी माझ्या जिजा ची खूप काळजी वाटत होती , पण स्वामींनी माझ्या बहिणेला त्यांच्या छात्रछाये खाली ठेवल्या ,पण आता मी निश्चिन्त आहे ,माझी बहीण जिजा जरा वेगळी आहे ,पण तिनेच मला समजावलं ,तेव्हा कुठे मला उपरती झाली ,आता माझ्या जीजेचा देवबाप्पाच माझ देवबाप्पा आहेत " राधा स्वामींना नमसकार करते . राधा स्वामींसाठी श्रीखंड पुरी आणले आहे .स्वामी :"ते आजोबा दिसतायत ,त्यांना खाऊ घाल श्रीखंड पुरी ,म्हणजे ते आमच्यापर्यंत पोहचेल " राधा त्या आजोबाना श्रीखंड पुरी देते पण मनात विचार करते :"ह्या बुवाला आपल्या कडे करायचा असेल तर हे सगळं करावाच लागेल " ते आजोबा श्रीखंड पुरी खाऊ लागतात .राधा बाई मात्र त्यान्च्याकडे रागाने बघत असते . 

राधा अक्का स्वामी येणार आहेत म्हणून खुश आहेत आणि त्यासाठी तयारी करत आहेत ,स्वामींच्या आवडीची ,अंबाड्याची भाजी भाकरी आणि खीर बनवतात . चोळप्पा म्हणतात :"सासू बाई स्वामी काही फक्त आपल्या कुटुंबाचे राहिले नाहीत ,ते सगळ्या अक्कलकोटचे झालेत ,समजा स्वामींना  अचानक कुठे जावं लागला तर तुम्ही जे सगळी तयारी करून ठेवली आहे ती फुकट जाईल ना  " राधा अक्का :"तर तर ,असा बर होऊ देईन मी ,तो जिथं असेल त्याला हाताने धरून घेऊन येईन मी ,त्याला कुठे हि जाऊ द्याची नाही मी " तिथे स्वामी येतात. "शिव शंकर शंभो ,चोळ्या आम्ही आलो बर का " राधा अक्का खुश होऊन :"बैस हो बैस आता आलास ना ,तर कुठे हि जाऊ देणार नाही मी ,छान  बेत केला आहे तुझ्या आवडीचा सगळं , माझ्या वाटणीचा लोणी सुद्धा तुला देणार आहे शी हरी शी हरी  " स्वामी :"वाह वाह चोळ्या , अरे जो पर्येंत आम्ही इथे मुक्काम ठोकला होता तोवर एवढे लाड काय आमचे झाले नाहीत ,जरा मुक्काम काय हलवला तर एवढा प्रेम उतू चाललंय ,हम्म ह्याला म्हणतात अति परिचयात अवज्ञा " राधा अक्का :"असं  काही नाही आहे हो , तुला हवी तेवढी खीर खा ,सगळी संपवलीस तरी मी काही रागवायची नाही " स्वामी :"आगा तू किती हि रागावलीस तरी आम्ही ती खीर तर आम्ही  खाणारच ,पण आता कोणी तरी आमची वाट पाहत आहे  "

3. दुसरीकडे हरी भाऊ घरी येतात :"तू आणि चूलपाशी " कालिंदी :"अहो म्या रोजच तिथं दिसणार आहे,आपली चंदा ,आपल्या घरासाठी केवढा करती " कालिंदी आपला दागिना दाखवते आणि सांगते दाजीबा सरकार नि दिला आहे म्हणून . छंद घरी येते .कालिंदी तिला बसवते . :"चांदुले बैस हा ,मी तुझ्या साठी भाकरी करते,पण आदी मी हा  दागिना काढून ठेवते  " कालिंदी आतमध्ये जातात . हरी भाऊ :"चांदुले ,ह्या कालिंदीच्या बदललेल्या रूप वर जाऊ नकोस हा,उद्या ती परत बिनसले तर तुला वाईट वाटेल "  चंदा :"आरा बा ,दागिन्यांमुळं का होईना त्या माझ्या बरोबर एवढा प्रेमानं वागतायत ,आणि त्यातच मला समाधान आहे बघ ". 

4. दुसरीकडे राधा बाई दाजीबा सरकार ना विडा खाऊ घालते . दाजीबा :"ह्या वेळेला त्या बुवा ला अशी अद्दल घडवायची कि गम्मत आली पाहिजे " राधा :"सरकार अहो डाव काय खेळायचा आणि कधी , हे सगळं ह्या राधान ठरवलंय ,तो बुवा आज रात्री इथं येईल असा बेत केलाय राधान " दाजीबा :"तू बुवा लै हुशार आहे,साधा सुद्धा नाही तो " राधा :"असेल तो बुवा हुशार ,पण मी बी राधा आहे राधा ,या राधा ला तो बुवा नाही कसा म्हणेल ते मी बगतेच "

दुसरीकडे स्वामी त्यांनी रंगवलेलं मडकं जमिनीत पुरतात. त्यावर एक छोटा मडकं  ठेवतात . भीमा तिथे येऊन त्यांना फुलं वाहतो. 

No comments:

Post a Comment