S1 E186 1st Aug Swami bhaktano namaskar
1. राधा अक्का चोळप्पा चे वाट बघत बसलेत .चोळप्पा आल्यावर सौन्दर्याचे चे कौतुक करतात . राधा अक्का त्यांना अंगारा लावतात . येशू चिडून ,"तुम्ही सांगाल का कोना बद्दल बोलताय " चोळप्पा :"आगा मी आपल्या स्वामी बद्दल बोलतोय " स्वामी :"बागतीयास काय,आगा आम्ही झपाटलंय त्याला ,आगा एक वेळ त्या राधाने झपाटला असता तर सुटका झाली असती ,पण आमचा झपाटण हे जन्मो जन्मीचा ,पाठ सोडत नाही आम्ही " असे म्हणून स्वामी हसू लागतात ..चोळप्पा :"अहो स्वामी हेच तर आमचा भाग्य आहे " असे म्हणून चोळप्पा आणि येशु स्वामींना नमस्कर करतात .
दुसरीकडे राधा त्या खोलीत एका मुलीला जेवण द्यायला जाते .पण ती मुलगी तिला खेळणं फेकून मारते . फुटाण्या ,:"एवढी मोठी जखम , सगळं राणीमहाल सजल्य,राधे आता कसा ग व्हायचा " राधा" " होणार "आवरायला जाते . राधा ची नोकरांनी तक्रार करते ,"सकाळी जरा पाणी जास्त गरम झाला तर बाईनी मला छडीने मारला आता एवढी मोठी जखम झ्हाली तरी हू नाही का चू नाही " फुटाण्या :"फरक आहे तुझ्यात आणि आतल्या व्यक्ती मध्ये ,कळलं ना "
दुसरीकडे रामाचारी कडे गावकरी राधाचा कौतुक करत असतात आणि त्यांना राधाचा नृत्य बघायला बोलवतात .रामाचारी चिडून म्हणतात ,"वेद शास्त्र पंडित रामाचारी म्हणतात मला ,तुम्ही किती हि म्हणालात तरी आम्ही मात्र मानसिक दृष्ट्या ढळणार नाहीत ,तेवढे आम्ही कणखर आहोत " तरीपण बंडोपंत ,नाऱ्या आणि भिमा राधा चे कौतुक करतात .रामाचारी पण येणार असतात तेव्हा गया ताई सगळ्यांना नाश्त्याला बोलावतात .पण सगळेजणं न्याहारी झाली आहे असे सांगून निघून जातात. रामाचारी :"आरे जा जा ,आगा तुझ्हा नशीब थोर म्हणून माझ्या सारखा पुण्यवान नवरा भेटलाय ".
2.दुसरीकडे भाऊ रसूल त्यांच्या बायकोला दागिण्या चा गाठोडं दाखवतात त्यांची बायको :"अहो तुम्ही चोरी नाही केली ना " भाऊ रसूल स्वामीं ची सगळी लीला सांगतात .त्यांची बायको खुश होऊन स्वामींना भेटायचं म्हणतात . पण भाऊ रसूल :"आधी आपण मुंबई ला जाऊ , आपली सगळी काम रखडली आहेत ,आपले दिवस बदलतील ,आणि मग जाऊ आपण स्वामींना भेटायला ,आणि स्वामीच म्हणतात ना कर्म आधी " स्वामी :"व रे वाह आमच्या म्हणायचं नेहमी सोयीस्कर अर्थ काढता , दुःखात तुम्हाला देव आठवतो आणि मग आनंदात कुठे जातो रे तुमचा देव ,शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "
3. दुसरीकडे राधा च्या रंगमहालात राधा ची वाट बघात असतात . तो पर्यंत फुटाण्या नृत्य सुरु करतो,"आणि शिव मल्हारी ,दर्शनाला येतो जेजुरी ". सुमुख :"अरे तू अक्कलकोटच्या आहेस ना मग अक्कलकोटच्या नाव येईल असा काहीतरी म्हण की ".
तेव्हा वाटाण्या येतो आणि नृत्य सुरु करतो ,"दाजीबा सरकारचा गाव ,पंचकृषीत झालाय त्याचा नाव ,गावामध्ये गाव नाव त्याचा अक्कलकोट ,बाहेर गावचा बुवा बहरतो इथे पोटं ".
फुटाण्या :"हि समाधि मानस त्या बुवाच्या मागे मागे जात्यात बैलावाणी "
आणि मग परत राधा चा कौतुक करतात .
4. दुसरीकडे भाऊ रसूल ला झोप येत नसते ,ते विचार करतात "हि म्हणते तसा आताच जायला हवा का स्वामीं कडे , नको आधी मुंबई तली कामा करतो,तशीही मी ठरवलेले पैसे देणारच आहे नाही कुठे म्हटलो ,फक्त माझी अडलेली लमा पूर्ण करतो . मग परत येतो मग ,२०० काय ४०० देतो म्हणजे स्वामी हि खुश " स्वामी ह्यावर खूप चिडतात.
No comments:
Post a Comment