S1 E199 14th Aug Swami bhaktano namaskar
1. चंदा सगळं झाडून स्वामींना फुलं वाहते .स्वामी :"वाह बाळा ,छान प्रसंन्न वाटलं ,बर का भुजंगा ,चोळ्या तुम्ही सेवा करण आणि या चंदा ने सेवा करनं ह्यात फरक आहे . प्रत्येक पुरुषाने आपल्यामध्ये एक स्री जपली पाहिजे म्हणजे आपसूकच भावुकपणा येतो, सहनशीलता ,नीटनेटकेपणा येतो ,उगाच नाही काही अर्धनारी घंटेश्वराचा अवतार झाला ,त्याच्या मागे हीच भावना होती " तिथे भीमा स्वामींना फुलं वाहतो . स्वामी लक्ष्य ना देता मडकं रंगवू लागतात . भीमा जातो . भुजंगा :"चोळप्पा भाऊ हा भीमराव रामाचार्यांचा माणूस आहे ना मग हा काशाला येतो सारखा स्वामी त्याच्या कडे लक्ष सुद्धा देत नाहीत " चोळप्पा :"अहो भुजंगराव असा विचार करू नका स्वामी आपल्या कुठलाच भक्ताला निराश करत नाहीत .भीमरावांच्या हिताचा सुद्धा काहितिरी विचार स्वामींनी नक्कीच केला असेल "
भीमा ला मध्ये रामचार्य भेटतात :"अरे भीम्या तुला लाज कशी वाटत नाही ,अरे त्यांचा लक्ष्य सगळं त्या मडक्यावरती आहे ,तुला कळतंय का तुझ्या पेक्षा जास्त त्याला मडकं महत्वाचा वाटतं ,अरे अश्या वागण्याने तुझ्हा लग्न होत नाहीय,तुझा लग्न होणारच नाहो माझं शाप आहे " भीमा :"आचार्य मी माझं देव ठरवलंय ,मि स्वामींचा पाय सोडणार नाही "
2. दुसरीकडे देवयानी बाईसाहेबाना दाजीबा काढा पाजायला येतात . देवयानी बाईसाहेब :"नक्की काय आहे ह्यात ?" दाजीबा घाबरतात :"आमच्या समोरच वैद्य बुवानी काढा तयार केला आहे ,ह्यात ज्येष्ठमध अश्वगंधा असा बराच काहीतरी आहे ह्यात " देवयानी बाईसाहेब :"सरकार आन वैद्य बुवाना औषध बदलायला सांगू ह्याने नाही फरक पडत आहे आम्हाला " दाजीबा :"असा काय म्हणता ,वैद्य बुवानी औषध बदलूनच दिला आहे आम्हाला " सुमुख तिथं येतो "सरकार राजे साहेब प्रचंड चिडलेत तुमच्यावर , काल लखोटा घेऊन आलो होतो मी देवयानी बाई साहेबानाकडे दिला होता लखोटा , त्यात स्पष्ट लिहिलंय " देवयानी बाईसाहेब :"सरकार काय झालाय " दाजीबा :"तुम्ही काय बी काळजी करू नका अहो आजारी माणसाला थोडा विस्मरण होताच " देवयानी :"सुमुख भाऊजी काय झाला " सुमुख :"मी दिला होता लखोटा " दाजीबा :"राणी सरकारनं त्रास देत जाऊ नको ,अरे लक्ष्यात राहत नाही त्यांच्या " देवयानी :"नाही हो आम्ही शोधतो " तिथेच उशी मागे लखोटा सापडतो ..देवयानी :"माफ करा सरकार ,आमच्यामुळे झाला सगळं " दाजीबा :"अहो माफ करा सरकार माझ्या मूळ झाला सगळं " दाजीबा :"माफी कसली मागताय राणी सरकार यात " तिथे चंदा येते . सुमुख आणि दाजीबा घाबरतात .
3. दुसरीकडे राधा बाई कडे राधा पुरी तळत असते. फुटाण्या चिडून :"काय ग राधा ,बाकीच्या दासीं कुठं आहेत ,तू कसा स्वयंपाक घरात " राधा :"अरे मीच सांगितलंय सगळ्यांना ,आज फक्त मी आणि जिजा ,आमची आई पण असेच पाकात पुऱ्या बनवायची , तेव्हा मी जिजा असाच तिला मदत करायचो " तेव्हा जिजा हट्ट करते मी पण मदत करते .फुटाण्या सांगतो कि ते गरम आहे भाजेल तुला ,तो कडू औषध देईल तुला .जिजा :"कडू औषध तूच खा ,मी पुऱ्या करणार " फुटाण्या :"अरे विसरलोच मी,देव बाप्पानी सांगितलंय वेगळी चूळ मांडायला " तेव्हा राधा तिथे खाली बसते . फुटाण्या :"आगा राधा आपल्याला देव बाप्पा ला बोलायला जायचा आहे ना " दोघेजण बाहेर जातात . जिजा :"मी ताईला मदत करणार " जिजा गरम तव्या मधून गरम पुरी काढायला जाते .
बाहेर गेल्यावर फुटाण्या :"राधे ,आगा दाजीबा सरकारने तुझ्या साठी सांगावा धाडलंय " जिजा च्या हातावर गरम तेल सांडत . ती "ताई ताई " अशी जोरात ओरडते . दोघेजण घाबरतात .जिजा बेशुद्ध पडते . राधा " फुटाण्या जा दाजीबा सरकारला सांग " फुटाण्या :"आगा पण त्यांना जिजा बद्दल कळेल ना " राधा :"कळू दे ,आपली मदत तेच करू शकतील तिला खुप त्रास होत असणार " फुटाण्या जातो .
4. दुसरीकडे स्वामी रडत असतात . चोळप्पा :"स्वामि प्रत्यक्ष परमेश्वर आहेत, भक्त्याच्या पायाला ठेच लागली कि पाणी त्यांच्या डोळ्यातून येते , ते सगळ्या जगाची काळजी करतात " स्वामी :"चोळ्या आमचा बाळ आजारी आहे ,जर त्या बाळाचे भोग कमी करता आले असते कीव उधार घेता आले असते तर ते आम्ही कधीच घेतले असते "
No comments:
Post a Comment