S1 E189 9th Aug Swami bhaktano namaskar
1.राधा अक्का कलावंतीण राधा ला स्वामींनी चांगला धडा शिकवलं म्हणून खुश आहेत. स्वामी आतमध्ये येऊन :"काय ग आमची काळजी वाटते का ,आरती ओवाळणार आहेस " राधा अक्का :"चे मि कशाला आरती ओवाळू तुझही " असे म्हणून राधा अक्का जात असतात पण जाता जाता स्वामींच्या पाया जवळची फुलं उचलून "तुला वाटलं असेल तुझ्या पाया पडले म्हणून माझंही फुलं पडले होते म्हणून उचलले हो शिव हरी शिव हरी " चोळपा :"स्वामी तुम्ही जे सासू बद्दल बोलला होता त्याची हळू हळू प्रचिती यायला लागली आहे बर का " स्वामी :"काय आहे ना चोळ्या शुंभ जळालंय पण पीळ जायचा अजून बाकी आहे हरकत नाही आपण घालवू ,शिव शंकर शंभो "
2.दुसरीकडे गुरूजी ना दक्षिण देऊन ,"जिवंतपणे आई बापाची सेवा नाही करता आली त्या निमित्तानी एवढाच काय ते "असे म्हणून भोजनाला या म्हणते . गुरुजी पूजेला नमस्कार करून घ्यायला सांगतात . राधा फुटाण्याला नमस्कार करायला सांगते आणि खोली रिकामा करायला सांगते . आतमध्ये राधा जिजा ला म्हणजे राधा च्या बहनीला ,"हे बघ आई आणि बा ची पूजा केलीय ,हात जोड त्यांच्यापुढें,हात जोड बाळा " पण जिजा पुजेचा ताट फेकून रडू लागतें आणि वेड्या सारखा वागू लागते राधा :"जिजा काय झ्हाला बाळा ,विसर आता ते सगळं ,इथं कोणी भी नाही , " जिजा किंचाळत रडू लागते .राधा पण रडत बसते .
3. दुसरीकडे स्वामीं सूर्ययाकडे बघत असतात .राधा अक्का:"आगा येशू सांग त्याला दृष्टी दोष व्ह्याचा " स्वामी :"आगा ज्या तेजाची तू गोष्ट करतेयस ते तेज आम्हीच दिलाय त्याला " येशू :"बरोबर आहे स्वामी पण आम्ही सामान्य माणसं ,आमहाला खूप त्रास होतो तुम्हाला असा बघून " स्वामी :"आगा आमच्या लेकराला परिस्थिती चे चटके बसत असताना आम्ही थोडे चटके सहन केले तर बिघडला काय "
4. दुसरीकडे राधा जीजेचा लाड करते ,जीजू " आई आई असे ओरडते " आणि खुश होते .फुटाण्या आत येऊन ,"राधे बाकी वेळा तिला कोंडून ठेवतेस ,जेजे एकटीच असते ना त्यामुळे तिला त्रास होत असणार ,आपण तिला बाहेर घेऊन जाऊ का " राधा चिडून :"फुटाण्या आज बोललास पुनः बोललास तर याद राख ,जिजा बद्दल मी एक भी शब्द ऐकून घेणार नाही , आज तिची हि अवस्था या दुनिये मुळेच झ्हाली आहि, त्यामुळे तिला मी कधी या दुनिये समोर नाही आणणार तेव्हा ती बरी आणि तिची हि दुनिया बारी " तिथे दाजीबा येऊन राधा ला हाक मारतात . राधा जिजा ला आतमध्ये घेऊन जात असते . पण जिजा ऐकत नाही ..त्यामुळे राधा छकुली रडत आहे असे सांगते . जेजे आत जाऊन बाहुली घेऊन रडत बसते ,"रडू नको छकुली मी इथेच आहे मी कुठे नाही जाणार "
राधा पण रडत असल्यामुळे ति आवरायला जाते आणि फुटाण्याला ""माझा चेहेरा विस्कटलंय ,फुटाण्या तू थोडा वेळ सांभाळ त्यादजिबा सरकारना मी आलेच "
5.दुसरीकडे स्वामी आतमध्ये येऊन :"चोळ्या चोळ्या " असे हाक मारतात चोळप्पा येतात . स्वामीं :"आज पासून आमचा मुक्काम त्या वटवृक्षा खाली ,आम्ही या घरात पुन्हा कधी येऊ ते सांगता येत नाही "
चोळप्पा स्वामींच्या पाया पडून :"स्वामी मी तुमचा राग सहन करू शकतो पण विरह नाही ,स्वामी मला सोडून जाऊ नका ,आणि जर जाणं इतकाच महत्वाचा आहे तर मीही येतो तुमच्या सोबत " स्वामीं चिडून :"सारखा काय रे आमच्या मागे ,मागच्यावेळी तुला नेलं कारण त्यात तुझा उधार होता पण या वेळी आम्ही चालो ते आमचा कर्तव्य पूर्ण करायाचं म्हणून .चोळ्या आम्ही संन्यासी माणसं प्रपंच असलेल्या माणसांना आमच्या मागे येण्यात काही शहाणपण नाही ,,जा संसार कर तुझ्या प्रपंचात असू आम्ही ,उठ हे असला काही करून आमचा निर्णय आम्ही बदलणार नाहीय ,चाल उठ " असे म्हणून
स्वामी घराबाहेर जायला निघतात . येशू आणि चोळप्पा स्वामींच्या मागे जातात :"स्वामी ,तुम्ही कायम आमच्याच घरात राहावा हीच इच्छा आहे आमची "स्वामी :"असं बरं " असे म्हणून स्वामी आपले पादुका चोळप्पाना देतात .,"घे ठेव देव्हाऱ्यात आणि कर पूजा अखंड ,पिढ्यान पिढ्या ,ह्यापुढे जो कोणी चोळप्पा च्या घरी येईल त्याला आमचा दर्शन होईल या पादुकांच्या रूपानं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहि " चोळप्पा आणि येशू स्वामींना नमस्कार करतात
No comments:
Post a Comment