Avoid Copy Paste

Monday, 16 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 196 "स्वामींना आईच्या मायेने दटावले"

 1. राधा अक्का स्वामींना येऊन तक्रार करतात कि स्वामीनी काय अवस्था करून घेतली आहे . स्वामी उठून राधा अक्का ला हसून :"ओरड आगा किती दिवसांनी तुझा ओरडा झालाय ,जग  आम्हाला माउली म्हणते पण आज तू आई च्या मायेने दटावलंस छान वाटलं " हे ऐकून राधा अक्काचे डोळे पाणावले असते 

 2. दुसरीकडे सदा न्हावी  रामाचार्य ची  हजामत  करत असतो , सदा :"कधी  योग नाही  आला स्वामींना भेटायचा ,पण तसं झाला तर देवच पावला म्हणायचं .माझ्या हातानं त्यांची दाडी व्हावी एवढीच इच्छा आहे माझी  " आचार्य चिडून पैसे ना देता निघून जातात . 

चंदा स्वामींना भेटायला  येते .पण नरसप्पा  आणि भुजंग समोर कसा सांगावा हे विचार करत असते . स्वामी :"चांदुले बाळा तू काही नाही सांगितलं तरी तुझ्या मनातला गोंधळ आम्ही ओळखतो बारा ,आता एवढाच करायचा जे काही होत आहे त्यावर बारीक लक्ष्य ठेवायचा " चंदा स्वामींना नमस्कार करून निघून जाते. 

3. तिकडे सदा न्हावी स्वामींना पाहत थांबलेला असतो स्वामी :"काय रे सदा आमची दाडी करायची होती ना तुला " सदा विचार करतो :"ह्यांना कसा कळलं ".स्वामी:"अरे आम्ही कुठे का असेना ,जगातल्या सर्व कारभारावर  बारीक लक्ष्य आहे आमचा . पण आमची एक अट  आहे आम्ही काम करत असताना आमची दाडी करायची  " सदा मनातल्या मनात "काम करता असताना कशी दाडी करणार ,जरा जरी हलला आणि वस्त्र इकडे तिकडे झालं तर "  स्वामी :"आमची काळजी करतोस ,अरे हीच तर संधी आहे तुझी कसब दाखवायची ,,तुझी सेवा पसंत अली तर तुला रोज बोलावू नाही तर नाही ,काय मग करतोयस ना दाडी "  सदा हो म्हणून स्वामींची दाडी सुरु करतो .स्वामी हालत असताना हि स्वामींना नं दुखावता दाडी करून दिल्यामुळे स्वामी खुश होतात ."वाह सदा वाह ह्या पुढे तूच आमची दाडी करायचास " सदा खुश होतो .स्वामी :"अरे दाडी तर केलीस पण नख कोण कापणार " त्यावर सदा नख पण कापतो .भीमा हे सगळं लांबून बघतो .आणि तसाच निघून जातो. स्वामी फक्त हसतात . 

4. दुसरीकडे राधा दरवाजा चुकून उघड ठेवून जाते . त्यामुळे जिजा घराबाहेर पडते ,आणि सगळी लहान मुलं तिला त्रास देतात .तिथे आचार्य येऊन विचारतात कोणची आहे हि मुलगी .गावकरी माहित नसल्यामुळें गप बसतात .  सुमख पण तिथे येऊन तिची थट्टा करू लागतो . तिथे स्वामी येतात आणि सर्वाना जोरात ओरडतात.  

No comments:

Post a Comment