S1 E185 1st Aug Swami bhaktano namaskar
1.स्वामी गौरा बाई च्या घराबाहेर झाडा खाली बसलेत. स्वामी :"गौरा बाई भूक लागली आहे , भाकरी दे मला " गौरा बाई:"स्वामी तुम्ही इथे कशाला बसलात ,आत या ना मी करून देते तुम्हाला भाकर " स्वामी :"इतका वेळ नाही आमच्याकडे इथेच आणून दे लगेच " : गौरा बाई: "स्वामी पण भाकरी शिळी आहे " स्वामी :"चालेल " गौरा बाई :"अहो स्वामी शिळी भाकरी दिली तर पाप लागेल ना मला " स्वामी:"चाललो आम्ही चल " गौरा बाई:"अहो नको नको स्वामी आणते मी भाकर बसा " गौरा बाई भाकरी आणायला आत जातात . स्वामी :"शिव शंकर शंभो " असे म्हणून हसतात .
2. दुसरीकडे राधा अक्का आणि येशू तुळशी पूजा करत असतात. राधा अक्का :"आगा कोण कुठली कलावंतीण आपल्या गावात येऊन राहिली आहे .या गावाचा ना काय होणार आहे कोणास ठाऊक शिव हरी शिव हरी " येशू :"आगा देवाचा कार्य करावा ना तेव्हा देवाचा नाव घयावा" तिथे फुटाण्या येतो :"तुम्ही ज्या बाई बद्दल विचारात होता ना तिचा नाव राधा " राधा अक्का:"शिव हरी शिव हरी आगा तिचा आणि माझंही नाव एकच असावा का ?" फुटाण्या :"आहो तुम्ही जसा समजत ना तशी आमची बाई नाहीय, स्वर्गातल्या अप्सरेला लाजवेल इतकी सुंदर,मनमोहक सौन्दर्याची लावण्यवती ,शिवाय खूप मोठी नृत्यांगना सुद्धा आहे ती ,जिचा नाव आहे राधा " राधा अक्का:"शिव हरी शिव हरी ,आम्हाला काय त्याचा ,तू इथे कशाला आलास ते सांग आधी "फुटाण्या :"म्या बाईंचा निरोप घेऊन आलोय चोळप्पा साठी ,बाईनि त्यांना बोलावलंय " राधा अक्का :"आगा बाई ,शिव हरी शिव हरी ,माझ्या जावई याला कशाला बोलावलंय " चोळप्पा :"बोला काय काम आहे " फुटाण्या :"बाईंनी तुम्हाला मुद्रा विनिमया साठी बोलावलंय ,येता का " चोळप्पा :"चला " राधा अक्का :"चला काय चला लगेच त्याने म्हटल्यावर चला " येशु :"आई आगा स्वामींनी सांगितलं आहे ना " राधा अक्का:"येशे येशे आगा कसा समजाऊ तुला ,आगा आगी समोर लोण्याचा गोळा ठेवल्यावर लोणी वितळणारच ,चार जुन्या जाणत्या लोकांचे अनुभवाचे बोल आहेत हे ,शिव हरी शिव हरी " चोळप्पा :"सासू बाई अहो माझा काम आहे हे ,मला जाऊ दे तुम्ही काळजी करू नका " फुटाण्या :"या कि " चोळप्पा "चला " असे म्हणून राधा कढे जातात. राधा अक्का परत चोळप्पा ला थांबवायला जातात .
3. दुसरीकडे स्वामी भाकरी आधी मुंग्यांना खाऊ घालतात आणि मग स्वतः प्रेमाने खातात . तिथे एक व्यापारी येतो:"स्वामी मी भाऊ रसूल मुंबई वरून आलो आहे "स्वामी:"ठीक आहे ,खाऊ दे आम्हाला .तू खाणार आहेस ?" भाऊ रसूल नाही म्हणतात .स्वामी त्याला आपल्या बाजूला बसवतात. स्वामी गौरा बाई ला :"जा ह्याला भाकरी घेऊन ये " भाऊ रसूल:"स्वामी मला भूक नाहीय ,माझ्यामुळे कशाला त्या माउली ला त्रास " स्वामी :"मूर्ख ,दोन दिवस झालं खाल नाहीस ,आणि काळजी ने जेवण हि गेला नाही ना ती आणतोय भाकरी खाऊन घे "
4. दुसरीकडे राधा अक्का परत येऊन हरी ला सोबत घेऊन जावा असे सांगते .पण हरी बाहेर कामावर गेल्या मुळे चोळप्पा तसेच जातात .
5.दुसरीकडे भाऊ रसूल:"माझ्या व्यापारात खूप मंदी चालू आहे ,खूप कर्ज डोक्यावर आहे ,ह्यातून बाहेर पाडण्यासाठी खूप पैशा ची गरज आहे,स्वामी मला सोडवा ..ह्यातून सुटलो तर तुमच्या चरणी २०० रुपये ठेवीन " स्वामी:"बेवकूफ ,आम्हाला लाच देतोस ,पैसे देऊन कृपा विकत घेतोस अरे भक्ती करतो का व्यापार " भाऊ रसूल:"तसा नाही स्वामी,फक्त एक कृतग्न्यता म्हणून मी म्हटलं " स्वामी :"बघ हा आता हो म्हणतोयस नंतर माघार घेशील " भाऊ रसूल :"नाही स्वामी असा चुकूनही होणार नाही " स्वामी :"बरं " असे म्हणून पांढरी गोटी देतात ."हि जीवापाड जपायचा ,कोणलाही हिसकावून हि नाही घेता आला पाहिजे ,जा आता आमची विश्रांती ची वेळ झ्हाली आहे " भाऊ रसूल जात असताना एक इसम कुर्हाड घेऊन त्याच्या मागे लागतो . ते पळत पळत जाताना खाली पडतात :"स्वामी मला वाचवा " असे म्हणून डोळे झ्हाक्तात .तो व्यक्ती तिथून निघून जातो . भाऊ रसूल डोळे उघडून बघतात तर ,त्यांनी एक दागिन्यांच्या गाठोडं सापडत . तिथे स्वामींचा आवाज येतो :"हे तुझ्याच नशिबी होता आणि म्हणून च तुला ईत्पर्येन्त नेला आम्ही " भाऊ रसूल खुश होऊन निघून जातात . आणि दुसरीकडे स्वामी हातात ते कुर्हाड घेऊन हसत असतात. "नमामि शंकर शिव शंकर शंभो "
6.दुसरीकडे फुटाण्या चोळप्पा बद्दल राधा ना सांगतो ."राधे, हे मुद्रा साठी आले होते .लग्न झ्हालाय त्यांचा .आणि एक मुलगा पण आहे ." राधा :"वाटत नाही पाहून ,अजिबात वाटत नाही तुमच्याकडे बघून कि तुमचे लग्न झ्हाले आहे म्हणून , तुम्ही कवलेच वाटता कि " चोळपा :"जरा लवकर करता का मला बरीच कामा आहेत " राधा :"पाहुणं दमान घ्या कि,इथं सम्धी काम सावकाशच होत्यायत " असा म्हणून फुटाण्या ला आत पाठवते. राधा चोळप्पा कडे पाहत असते .पण चोळपा त्यांच्याकडे बघत नाहीत . फुटाण्या मुद्रा घेऊन येतो .राधा:"घ्या, हे बदलायचे आहेत ,आणि मोबदला तुम्ही सांगाल तो " चोळपा :"नेहमी जेवढा दर देता तेवढाच घेईन " राधा :"अहो ते तर तुम्हाला मिळेलच कि ,जर तुम्हाला अजून काही हवा असेल तर तेभी मिळेल ,अहो त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला काहीतरी देऊ शकते ,ज्यांना तुम्हाला आनंद होईल ,अहो पाहूना तुमचा अक्कलकोट खूप प्रेमळ आहे " . चोळप्पा :" हो आणि भक्ती पूर्ण सुद्धा आहे,इथे लोक एकमेकांना अडचणीत मदत हि करतात " राधा :"होय जशी तुम्ही आमची करतायत ,बार पाहून नाव काय म्हणालात तुमचा " फुटाण्या :"चोळप्पा " राधा :"हो चोळप्पा तुम्ही ह्या राधा ला मदत केली आहे ,त्याचा मोबदला तर तुम्हाला मिळेलच ,शिवाय या राधाचे रंगमहालचे दरवाजे उघडे असतील कायमचे ते हि अगदी विनामूल्य ,राधा जोवर ह्या गावात आहे ना ,तोवर तुम्ही राधा ची लावणी बघायला कावा भी येऊ शकता ,बर पाहुणं तुम्ही लावणी पहिली का कधी ?" चोळप्पा :"नाही " राधा :"आहोमांग या कि कधीतरी लावणी बघायला ,ढोलकी च्या तालावर थिरकणाऱ्या माझ्या पावलांचा नाच बघायला " चोळपा हसून :"अहों आम्ही ताल मृदूंगा मध्ये रमणारी मानस ,तुमच्या ढोलकीच्या आवाजाचा आम्हाला काय अप्रूप असणार " राधा :"मधाच्या पोळ्याला हात लावल्याशिवाय कसा कळल ,कि मधमाशी चावते म्हणून मग काय त्याचा आस्वाद घायला नको?" चोळप्पा :"पण काय आहे माझी इच्छाच नाहीय " राधा :"श्रुंगार हा आयुष्याचा भागच असतो " चोळपा :"बरोबर आहे ,श्रुंगार हा आपल्या आयुष्याचा भाग असतोच पण श्रुंगार हा नैतिक असावा असा आम्हाला शिकवलंय ,अहो आणि आम्हाला हि मोगऱ्याचा गजरा आवडतोच ,पण तो मोगरयाचा गजरा आम्ही आमच्या बायकोच्या केसात मळण्य साठी घेतो तो गजरा तुम्हाला कधीच आमच्या मनगटात बांधलेला दिसणार नाही ,किंवा कोणाच्या पायाखाली हि दिसणार नाही " राधा :"तुम्ही ना पहले व्यक्ती आहात ज्याला ह्या राधा ची भुरळ नाही पडली " चोळप्पा स्वामी चा सुंदर रूप आठवून म्हणतात :"अहो मी इतका अलौकीक आणि अद्भुत रूप पाहिलंय कि आम्हाला या भूतलावर च्या सौन्दर्याच्या काय किंमत असणार ,मी खरा सौन्दर्य पाहिलंय , असो तुम्हाला नाही समजणार. तुमचा हे काम झालं कि तुम्हाला आणून देतो ,येतो मी " चोळप्पा तिथून निघून जातात . फुटाण्या :"राधे हे पाणीच जरा वेगळा आहे,आणि जर शिष्य च असा आहे तर गुरु कसा असल "स्वामी हसून :"शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "