S1 E200 21st Aug Swami bhaktano namaskar
1. स्वामी चोळप्पा :"आमचा बाळ आजारी आहे ,त्याला आमची गरज आहे ,जर त्या बाळाचे भोग कमी करता आले असते किंवा किंवा उधार घेता आले असते तर केव्हाच घेतले असते ,चाल आमच्या बरोबर " असे म्हणून स्वामीं चोळप्पाना घेऊन जातात .
दुसरीकडे दाजीबा सरकार सुमुख ला चंदा बद्दल सांगतात कि "चंदा खुप तेज आहे ती आमच्या कक्षा पर्येंत पोहोचली होती . तिला आपल्या कटा बद्दल कळलं ना तर अगदी गोंधळ होईल " तिकडे राधा चे सहकारी येतात दाजीबा सरकार ला मुजरा करून :"सरकार राधा बाई ची बहीण आजारी आहे ,आणि तिला तात्काळ मदतीची गरज आहे " . सुमुख आणि दाजीबा आश्चर्य चकित होतात सुमुख :"सरकार राधा ला बहीण आहे ,तस राधा ने काडी सांगितलं नाही हो " दाजीबा :"असेल लांबची बहीण " आपल्या सेवकाला :"एक काम कर आपल्या राजवैद्य ना ह्यांच्यासोबत पाठव " राधा चे सहकारी तिथून निघून जातात . दाजीबा
सुमुख ला :"सुमुख निघ आता , राणी साहेबांचा औषध घेऊन ये पण सांभाळून आपण वैद्य बुवा कडून नाही तर दुसऱ्याच व्यक्तीकडून औषध आणतोय हे कोणालाच कळता कामा नये " सुमुख :"सरकार तुम्ही काळजी करू नका सगळं बरोबर कारेन " चंदा सगळं ऐकते . ती विचार करते:"म्हणजे देवयानी बाईसाहेबांचं औषध सरकार राज वैद्य कडून घेत नाहीत " तेवढ्यात दाजीबा सरकार ची नजर छंद वर जाते :"कुठे चाललीस " चंदा :"बाईसाहेबांसाठी फुलं आणून गजरा करणार होते " दाजीबा सरकार:"ठीक आहे जा "
2. दुसरीकडे राजवैद्य राधा ला :"लहानपणी अशी कोणती घटना घडली होती का " राधा बाई :"होय आमच्या आईचा आणि बाचं जाणं खुप मनावर घेतलं " राजवैद्य:"ती सारखा देव बप्पा म्हणते तसा कोणी आहे का " राधा बाई :"नाही तास कोणी नाही ती मनाचा सांगते ,वैद्य बुवा तुम्ही तिला लौकर बरं कराल ना " वैद्य :"चंदनाचा लेप लावतोय पण तिला सहन होत नाहीय लहान पोर आहे ती ,औषधं तिला पोटातून द्यावा लागेल ,त्याच्यासाठी एक पाला लागेल ,आणि नेमका ती माझ्याकडे नाहीय ,तो पाला ह्या मौसमात नाही मिळत आता हवा असेलतर चमत्कारच व्हावा लागेल "
3. दुसरीकडे स्वामी आणि चोळप्पा गावाबाहेर एका माळरानावर आलेत .स्वामी :"शिव हरी शंकर , नमामि शंकर , शिव शंकर शंभो " असे म्हणताच तिथे पाऊस येऊ लागतो .आणि माळरानावर जिजा ला हवी असलेली झाड अंकुरत पालवी फुटून बाहेर येते . स्वामी :"चोळ्या आता आम्ही जे सांगतो ते नीट ऐक "
दुसरीकडे वैद्य बुवानी आपल्या माणसाला तो पाला आणायला पाठवलेलं असता . तो माणूस येऊन :"सगळीकडे शोधले पण कुठेबीही नाही सापडलं पाला "
राधा :"वैद्य बुवा आता काय करायचं " वैद्य :"आता देवावर सोपवायचा मला क्षमा करा " हे ऐकून राधा खूप रडू लागते . तेवढ्यात इकडे चोळपा स्वामींनी दिलेला पाला राधा च्या घरात चुपचाप ठेऊन निघून जातात. स्वामी:"शाबास चोळ्या दिलेला काम तू चोखपणे पार पडलास " राजवैद्य निघत असतात तेव्हा ते फुटाण्याला : "चंदनाचा लेप लावायला सांगा त्यांना बरं वाटेल ,पण जर तो पाला भेटला असता बरं झाला असतं " त्यांचा लक्ष्य चोळप्पा नि ठेवलेला पाला कडे जाता . वैद्य :"अहो कोणी कुठून कसा आणला माहित नाही ,पण आपल्याला जो पाला पाहिजे होता ना तो आपल्याला मिळाला " फुटाण्या :"राधे मी तुला म्हटलं नव्हता खंडोबा आपल्या पाठीशी आहेत " राधा तिथूनच खंडोबाला नमस्कार करते .वैद्य बुवा जिजा चा उपचार करायला जातात .
4. दुसरीकडे चंदा सुमुख च्या मागे येत असते . आणि सुमुख तिला पाहणारच असतो पण त्याच क्षणी समोर एक बाई आडवी येते आणि चंदा ला पाणी पाजते . सुमख ला चंदा दिसत नाही आणि तो तसाच निघून जातो .. चंदा त्या बाई ला :"बरा वाटलं बघा तहानच लागली होती " ती बाई :"बाळा सांभाळून जा " चंदा हो म्हणून पुढे जाते . त्या बाईच्या वेशात स्वामीच असतात आणि ते चंदा ला वाचवायला आले असतात . सुमुख त्या माणसाला :"मी दाजीबा सरकारचा माणूस आहे ,दाजीबा सरकारचा औषध कुठे आहे " सुमख ते औषध घेऊन निघून जातो. चंदा हे सगळं पाहू विचार करते :"खास औषध ,काय गौड बंगाल आहे "
No comments:
Post a Comment