Avoid Copy Paste

Tuesday, 31 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 210 "स्वामींनी दिले श्री कृष्ण रूपात दर्शन "

 


 S1 E210 30th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 210 "स्वामींनी दिले श्री कृष्ण रूपात दर्शन "  



स्वामी जीजा ला :"पोरी छान आज तू बहीणी ची लाज राखलीस " फुटाण्या राधा ला :"राधे ह्या बुवा कडे नक्की मोठीच शक्ती आहे बघ ,म्हणून नंतर मनाचा बी ऐकतॊय तो " राधा बाई :"गप उभार इथे " स्वामी :"फुटाण्या अरे तुझी भावना आमच्याकडे पोहचली बर , अरे सच्ची भावना आमच्याकडे आपोआप पोहचते ,शिव हरी शंकर नमामि शंकर शंभो "


स्वामी चोळप्पांच्या घरी गेल्यावर: "हा विडा राधा आक्कांनी बनवलं आहे वाटतं " राधा अक्का :"तर तर सगळं नेमका कळत ह्याला ,तसं काही नाही हो जावायचा भार हलक केलं एवढच " स्वामी :"चोळ्या आम्हाला आता बासरी हवीय " सकाळी स्वामी दूध पित नाहीत" नाही नको जोपर्यंत चोळ्या आम्हाला बासरी देत नाही तोपर्यंत काही नको.  "   चोळप्पा जाऊन बासरी घेऊन येतात . स्वामी :"वाह चोळ्या  , जा बस आता अराम कर आता ,लगेच येऊ नको आमच्यामागे "


दुसरीकडे राधा आणि  फुटाण्याला बासरीचा आवाज येतो . ते शोधात जातात आवाज मागे . एक आंधळा साधू बासरी वाजवत असतो .साधू :"कोण?" राधा बाई :

"बाबा कोण तुम्ही ,तुमचा नाव काय ,कुठल्या गावचे ,बासुरी कुठे शिकलात ,छान  वाजवता " बाबा :"मी सूरदास , मी जन्मतः आंधळा आहे , परमेश्वराने मला हि कला आनंद मिळावी म्हणून दिली असावी बहुतेक , भगवान श्री कृष्ण च्या हातात हि बासरी असते असा ऐकलंय ,"खरंतर कृष्ण कसा दिसतो मला माहित हि नाही ,याची देही याच डोळी दर्शन घ्याचा आहे "

राधा बाई विचार करते स्वामींची फजिती करावी . म्हणून ती :"बाबा,ह्या गावात एक सिद्ध पुरुष राहतात ,तुमची श्री कृष्णा दर्शनाची इच्छा नक्की पूर्ण करतील, स्वामी लै पोचलेले सिद्ध पुरुष आहेत, अशक्य हि शक्य करतात अशी ख्याती आहे त्यांची "

दोघेजण सूरदास बाबाना स्वामींकडे घेऊन येतात .  स्वामी ध्यानात बसलेत .. सगळेजण वाट बघत बसतात . 


दुसरीकडे दाजीबा देवयानी बाईसाहेबानची काळजी घेत असतात .देवयानी :"सरकार आम्ही आजारपण आईसाहेबांना जाणवू देणार नाही " . दाजीबा मनात विचार करतात "राणी साहेब हे सगळं कारण भाग आहे हो आम्हाला नाहीतर नसतं इतका त्रास दिला , हे सगळं तुझ्यासाठी चालू आहे चंदा आणि तुला त्याची खबरच नाही "  तिथे सुमुख येतो  आणि दाजिबांना  महाराजांकडे घेऊन जातो  . देवयानी बाईसाहेब आई साहेबाकडे घेऊन चल म्हणून चंदा ला  त्यांच्या  सासू कडे घेवून जातात .  सासू त्यांना पाय चेपायला सांगतात . सासू त्यांना लाथ मारतात . "हे असा असता पाय चेपण ,इतका हलका " सासू त्यांना परत पाय चेपायला लावतात. चंदा  मनात विचार करते  :"स्वामी मला हे बघवेना झालाय आता तुम्हीच काहीतरी करा "

दुसरीकडे सूरदास बाबा ,राधा फुटाण्या आणि सगळे गावकरी स्वामींची वाट बघत बसतात. पण स्वामी ध्यानांत च बसलेत .  


No comments:

Post a Comment