Avoid Copy Paste

Wednesday, 18 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 198 "स्वामींच्या डोळ्यातून पाणी "

 1.   राधा अक्का स्वामींसाठी विडा कुटून देतात . चोळप्पा आणि येशू हे बघून खुश होतात . 

2. दुसरीकडे भुजंग स्वामींना :"स्वामीं ह्या नारसप्पा ला कानडी मध्ये बोलताना ऐकलं ना मला माझ्या मोहिमेची आठवण झाली बघा . मी दक्षिणकच्या समुद्रेजवळ गेलो होतो तेव्हा तिथली भाषा काही काळात नव्हत" स्वामी :"तरीपण तिथल्या मातीनी तिथल्या माणसांनी सांभाळून घेतला नाही का , अरे भाषा हे फक्त माध्यम "

तिथे चोळप्पा विडा घेऊन येतात . स्वामी तो विडा खाऊन :"हा विडा तुझ्या हातचा नाही " चोळप्पा :"अहो हा विडा सासूबाईंनी तुमच्या साठी तयार केलाय ,अहो विदा चक्क चांगला रंगलाय कि " स्वामी :"अरे हा भक्तीचा रंग आहे , बर चल आमच्या झोपायची वेळ झाली आहे " तेव्हा राधा बाईचा तमाशा चालू होतो . भुजंग चिडून सगळं थांबवायला सांगतात . पण राधा बाई "हे बघ स्वतः दाजीबा सरकारनी परवानगी दिलिया तवा मला पाहिजे तिथेच मी खेळ करणार . ते बी या बुवाच्या नाकावर टिचून .या बुवानि माझ्या रंगमहालात येऊन माझ्या रंगमहालचा बेरंग केला ना .त्याचा बदला घेतल्या शिवाय हि राधा गप नाही बसायची "  

चोळप्पा : "स्वामींचा शब्द डावलून कोणी तुमचा खेळ पाहायला येईल असा वाटत नाही मला " पण सगळे गावकरी येतात . राधा :"आले कि सगळे ,ओ चोळप्पा भाऊ ,अहो तुमच्या बुवाची लक्ष्मण रेखा सगळ्यांनी ओलांडली " 

गावकरी आणि भुजंग ,चोळप्पा यांच्या मध्ये वाद विवाद होते . स्वामी दोघांना परत बोलावतात . 

राधा बाई  चा खेळ चालू होतो . पण ढोलकी चा आवाज ना येते टाळ मृदूंग वाजू लागते . सगळेजण घाबरतात .  फुट्याण्या :"नीट वाजवा कि "

खेळ परत चालू होतो . दाजीबा सरकार पण येतात . राधा बाई ची लावणी पण सुरु होते .दाजीबा सरकार खुश होतात. पुन्हा ताल मृदूंगाचे भक्ती गीत सुरु होते . 

दाजीबा सरकार  चिडून :"बंद करा हे, काय राधा बाई काय चाललंय हे,असलंच काही करायचा असेल तर मंदिरात जायचा होत" विजेचा गडगडाट होतो . स्वामींची आकाशवाणी ऐकू येते :"शृंगारातून भक्ती कडे जाणे आम्हाला काही नवीन नाही ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " 

सगळेजण परत जातात 

3. दुसरीकडे राधा बाई घरी जाऊन रडत बसते . जिजा :"ताई तू रडू नको ,मी तुला ना सांगता कुठे नाही जाणार " राधा :"तू तर माझी आई झाली बग  " जिजा :"तू तर माझी रोजच आई होतेस " राधा :"जिजा मी खूप प्रयत्न करते तुझी आई बनायची ,पण मला जमतच नाही ,आपल्या आई ने खूप सहन केलाय ,कायम सरळ मरागने चालत राहिली पण मी मात्र  ... " असे म्हणून राधा मधेच थांबते . आणि दोघेजण झोपी जातात .  तेव्हा तिथे स्वामी येतात आणि दोघांना पांगरून घालतात आणि म्हणतात  :"माणूस चुकत असला कि त्याला काळत नाही ,पण आम्ही आहोत ,आगा आमच्या संपर्कात यायला सुद्धा पुण्याई लागते आणि ते तुमच्यात आहे  ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर "  


No comments:

Post a Comment