Avoid Copy Paste

Saturday, 14 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 193 "स्वामींनी नरसाप्पाचा हात बरा केला"

1. आचार्य  विचारतात स्वामीं हुक्का का ओढतात आणि त्यानं कोणाचा भल होणार आहे.  तिथे कन्नड भाषिक नारसप्पा चा हात खूप दुखत असतो .स्वामी त्यांना बोलवून :"काय रे हात दुखतोय का ?" नारसप्पा :"हो ?" स्वामी त्या हुक्काचा धूर नरसप्पा च्या हातावर सोडतात .त्यांचा हात बरा होतो .ते बघून आचार्य चिडून  निघून जातात . 

2. दुसरीकडे दाजीबा सरकार :"काय राधा बाई जादू ओसरली का तुमची ? कुठे आहेत मंडळी " राधा बाई :"शक्यच नाही ,अहो सरकार आता कुठे मी आलीय मला लोकांना साद तर घालू द्या " लावणी सुरु झाल्यावर ढोलकी च्या आवाजाने सगळे गावकरी लावणी पाहायला येतात . त्यामुळे वटवृक्षाखाली बसलेले स्वामी खूप चिडतात .चोळप्पा :"काय झाला स्वामी "  स्वामी :"मोह आणि लालसा वाईट रे चोळ्या ,इतका सांगून हि जे नको व्हयायला होता तेच होतंय "

3. दुसरीकडे चंदा स्वामींना भेटायला येत असते. पण कालिंदी तिचा हात पकडून तिला घेऊन जाते . राधा अक्का आणि येशू हे सगळं बघत असतात . राधा अक्का :"आता जर बुवा असता तर ह्या कालिंदी ला चांगलाच धडा शिकवलं असता " येशू :"आई आजकाल तुला स्वामींची फार आठवण येतेय " राधा अक्का :"तस काही नाही हो " 

4. दुसरीकडे स्वामी चोळप्पा ना घेऊन राधा च्या घराजवळ आले असतात . स्वामी चोळप्पा :"तू इथेच थांब मी येतोच " दुसरीकडे जिजा छकुली बाहुली बरोबर खेळत  असते तर तिथे एक नाग येतो .जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " अशी हाक मारते.  

No comments:

Post a Comment