Avoid Copy Paste

Wednesday, 13 October 2021

जय जय श्री स्वामी भाग 249/ jai jai shree swami samarth ep. 252/ep.10 october/colors marathi

 --252

गावात एक नवीन गुरु वाजत गाजत येतातआणि खंडोबाला सोना अर्पण करतात . सुमुख :"अहो आचार्य सोनं " स्वामी :"जहर आहे जहर".  आचार्य गुरु बद्दल विचारतात . तो शिष्य गुरु ना भेटायला सांगतो. 

दुसरीकडे दाजीबा सरकार राणी सरकार चे पाय डब्याचे नाटक करतात. दाजीबा सरकार चे आई येऊन चिडतात आणि देवयानी बाईसाहेबाना ओरडतात :"वाड्यात नौकर कमी पडलेत का , अजून किती दिवस आजारी असणार आहेत ,एवढा करून पण आम्हाला नातवंडांचे तोंड पाहायला मिळणार नाही ,तुमच्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे". असे म्हणून निघून जातात. तिथे चंदा देवयानी बाईसाहेबांना प्रसाद घेऊन येते.पण दाजीबा सरकार तिला बाईसाहेबाना प्रसाद देऊ देत नाहीत आणि स्वतः प्रसाद घेऊन नंतर खाऊन टाकतात. 

दुसरीकडे रामाचार्य गावातल्या नवीन गुरु ला भेटायला जातात. एक शिष्य त्यांची वाट अडवतो आणि दर्शनाला उद्या यायला सांगतात.  आचार्य त्यांना दाजीबा सरकारचं खास व्यक्ती असल्याचा सांगतात. मग तो शिष्य त्यांना  थांबायला सांगूनआतमध्ये जातो. पण खूप वेळ झाल्यावर रामाचार्य स्वतः च आश्रमामध्ये जातात. आतमध्ये एक साधू ध्यानात बसलेत. पण त्या साधू हवेत तरंगत असतात . आचार्य त्यांना बघून चकित होतात . 

दुरीकडे चंदा स्वामींकडे येते. स्वामी :"आगा देवाचा प्रसाद खालला  म्हणून देव पावतो असा नाही , आपण ज्या भावनेनं प्रसाद खातो ते महत्वाचं" 

जय जय श्री स्वामी भाग 251/ jai jai shree swami samarth ep. 251/ep.10 october/colors marathi

 --251

तारा अक्का सोमवती अमावास्याला खंडोबाला अभिषेख घालायचा आठवण करून देतात. सागेलेजन तयारीला लागतात . बाळप्पा स्वामींना मनातल्या मनात :"स्वामी माझ्या योग्य काही काम असेल तर सांगा " तिथे स्वामी येऊन :"अरे हा बाळप्पा ,आणेल कि पाणी ,त्याला सवय पण आहे अणे आवड पण आहे या सेवेची " बाळप्पा स्वामींना नमस्कार करतात. स्वामी सगळ्यांना गूळ वाटतात पण बाळप्पा राहून जातात. बाळप्पा दुखी होतात. 

दुसरीकडे कृष्णप्पा स्वतःहून पाठांतर करत असतो. सगळेजण त्याचे कौतुक करतात आणि त्याला खंडोबाच्या अभिषेखला न्याचा ठरवतात आणि त्याला नवीन सदरा देतात.

दुसऱ्या दिवशीं सगळेजण तयारी करतात. राधा अक्का अभिषेख साठी दूध आणतात. चंदा आणि कृष्णप्पा दोन माळ तयार करतात एक खंडोबाला आणि एक स्वामींना.  चंदा देवासाठी गाणं म्हणते. आचार्य चीड चीड करतात आणि स्वामींना "काय रे बुवा देवा कडे पाठ करून बसलास " स्वामी :"अरे रामाचार्य रोज धर्मकृत्य करतोस त्या नावाखाली लोकांना लुबाडतोस ,अरे तू किती पण देव भक्तीचा देखावा केलास ना तरी मनातला काळ कसा लपवणार " चोळप्पा पण विशोभा खेचर यांचा उद्धरण देतात कि ते कस शंकराच्या पिंडीवर पाय टाकून बसले होते."आचार्य स्वामींसारख्या सिद्ध पुरुषाला आपल्यासारख्या सामान्य माणसाचे नियम लागू होत नाही " बाळाप्पा पण पाणी घेऊन येतात. चोळप्पा :"अहो बाळप्पा एवढा ओझं एकट्यानं का आणलात मला सांगायचं " बाळप्पा :"अहो हे प्रेमाचा ओझं आहे व्यक्त केलं कि मन हलका होतं " कालिंदी चिडून :"ह्या बुवाला हात खाली राबायला माणसंच हवी असतात वर मोबदला पण देत नाही "

राधा अक्का :"कालिंदी तुझी जीभ अडकित्ता आहे हे सगळ्यांना माहित आहे, एक अनोळखी माणूस देवकार्यात आपल्याला मदत करतो , तुझं  काय ग मध्ये मध्ये ,गप बस " आचार्य पूजेला बोलावतात. आचार्य खंडोबाला अभिषेख घालून पूजा करतात. सगळेजण :"खंडोबाच्या नावाने चांगभलं" सगळेजण हळद उधळून खंडोबाला नमस्कार करतात. बाळप्पा स्वामीना :"स्वामी ,असा वाटतंय ,सगळी नागरी जणू सोन्याची झाली" स्वामी :"सुवर्ण , आता ह्या नगरात सोन्याचाच बोलबाला होणार "

Sunday, 10 October 2021

जय जय श्री स्वामी भाग 249/ jai jai shree swami samarth ep. 249/ep.10 october/colors marathi

 राधा अक्का घरी येऊन ताईत चा प्रकरण सांगतात. दुसरीकडे बाळप्पा अंघोळ करून स्वामींना भेटायला निघतात ,पण आधी शंकराची पूजा करतात.स्वामी पण चोळप्पांच्या घरातून निघतात.  बाळप्पा चोळप्पाच्या घरी येतात, चोळप्पा त्यांना गुलपाणी घ्याला सांगतात , पण बाळप्पा आधी स्वामींना भेटायला जातात आणि नंतर सविस्तर बोलू असे सांगतात. 

दुसरीकडे स्वामी सुमुख ला खडसावतात "निर्मलाला त्रास देऊ नको , ती आमची लेक आहे". असा सांगून स्वामी पुढे जातात.सुमुख घाबरून आचार्यां :"निर्मला मला काय शोभायची ,तिला ना रंग ,ना रूप , हा बुवा सांगतो म्हणून नाही बारा का". सुमुख मग चंदाला वाड्यावर यायला सांगतो. पण चंदा मला बारा वाटत नाही म्हणून सांगते. कालिंदी चिडून तिला कामाला जायला सांगते. सुमुख सांगतो देवयानी बाईसाहेब आलेत. त्यावर वाड्यावर यायला चंदा लगेच तयार होते.

दुसरीकडे भुजंग आणि नरसप्पा काळजी करतात कि गाय चारा खात नाही. 

स्वामी आल्यावर :"काय ग आमच्याकरता थांबून आहेस होय , आलो " असे म्हणून गाईला चारा खाऊ घालतात आणि सांगतात ,"आता रोज भुजंग अन नरसप्पा च्या हातानी चारा खायचा , रोज रोज तुला चारा खाऊ घालायला वेळ नाही  ". असे सांगून स्वामी परत एका झाडा खाली येऊन थांबतात. बाळप्पा स्वामींना भेटायला आल्यावर, भुजंग सांगतात ,"आता इकडे गेलेत बघा " स्वामी बाळप्पाची परीक्षा घेत आहेत का?