देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत
सगळेजण स्वामी महाराजांची पाद्य पूजा करायची तयारी करत आहेत . सगळेजण चोळप्पांच्या भक्तीचे कौतुक करतात कि इतक्या काट्यावरून चालून हि इजा झाली नाही. चोळप्पा स्वामींची पाद्य पूजा करतात. "जय देव जय देव जय अवधूतां " राधा अक्का :"क्षमा करा स्वामी चोळप्पाच्या बाबतीत खूप चुकीचा विचार केला ,तुमच्या भक्त म्हणून तो थोर आहे " चोळप्पा :"अहो नाही नाही माझी कसली आलीय थोरवी ,जे काही केलाय ते स्वामींनी केलंय , श्री गुरुदेव दत्त " स्वामी :"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" सगळ्यांना आशीर्वाद दिला.
तिलोत्तमा चे सासू तिला समजावतात :"स्वामींच्या नखांचा ताईत करून विकू नका ,स्वामींनी स्पष्ट इशारा दिलाय " तिलोत्तमा :"उलट स्वामींनी शगुन दिलाय ,त्या चोळप्पा भाऊजी ना काय कळतंय " निर्मला येऊन स्वामींची आणि चोळप्पा कसे काट्यावरून चालतात आणि त्यांना काहीच जखम झाली नाही . आजी :"बघितला का तिलोत्तमा ,चोळप्पा स्वामींचा लै जवळचा भक्त आहे , स्वामींच्या बोलण्याचा अर्थ त्याच्या इतका चांगला कोणीच सांगणार नाही , सुधारा नाहीतर काहीतरी संकट यायचा"
दुसरीकडं रामाचार्य आणि सुमुख परत नवीन कट कारस्थान करू लागतात आणि सदा ला जाळ्यात अडकवण्याचा सांगतात. सुमुख परत निर्मलाला "सुमुखी सुमखी ,काय विचार केला नाही का माझ्या प्रस्तावाचा " म्हणून त्रास देतो. आचार्य चिडून सुमख ला बोलावतात.
दुसरीकडे चंदा दाजीबा सरकार मुलं काळजी करत असते. तिथे कृष्णप्पा येऊन तिला स्वामींचे आणि बाबांचे कौतुक सांगतो . चोळप्पा :"आपला विश्वास त्या काट्यापेक्षा जास्त पाहिजे ना ,आपल्या मनामध्ये स्वामीं वरची भक्ती असेल तर तिथे भीती ला जागाच उरणार नाही " असे म्हणून दोघे जातात . चंदा विचार करते :"चोळप्पा काका तर काट्यावरून चालून गेले आणि म्या स्वामी असताना बी दाजीबा सरकारच्या बोलण्याचा विचार करत बसलेय ,मला फक्त स्वामी आणि त्यांची भक्ती याच विचारात राहिला पाहिजे , मनांतल्या देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत"
दुसरीकडे आचार्य आणि सुमुख सदा कडे येतात. आचार्य :"मी तुझी स्मशरू करणार ,बक्कळ पैका कमावळास , स्वामींचे नखांचे ताईत करून विकलंस, त्यात मला हिस्सा हवा नाहीतर स्वामींना सांगेन" सुमुख :"त्यापेक्षा आपण दाजीबा सरकार ला सांगू म्हणजे ते त्यांना अंधार कोठडीत डांबून ठेवतील" सदा शेवटी हिस्सा द्याल तयार होतो. दुसरीकडे स्वामी :"चुकीच्या मार्गाने पैसे गेला तर त्याला फाटे फुटणारच , हपापाचा माल गपापा ,शिव शंकर शंभो"
No comments:
Post a Comment