Avoid Copy Paste

Monday, 13 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 224 "आम्हाला कागदाची गरज नाही"

 --जय जय श्री स्वामी समर्थ भाग 224 "आम्हाला कागदाची गरज नाही"



बाळप्पा एका पायावर उभे राहून शिव आराधना करत असतात. त्यांचा मुलगा बंडू त्याचा ताईला :"अक्का बाबाना एक गम्मत सांगायची आहे सांगू का " ताई :"नाही बंडू ,नंतर सांग तुला माहित आहे ना,बाबा दुसरा प्रहर संपे पर्येंत शिव आराधना करणार आहेत " बंडू :"विसरलोच मी,पण बाबा आपल्याला हवे तेव्हा आपल्यासोबत नसतातच ना " ताई :"बंडू असा नाही बोलायचं ,तो देव बाप्पा आहे ना ,तो सगळं ऐकतो "  बंडू :"देव बाप्पा चुकला असेल तर क्षमा कर या बंडूला" 

दुसरीकडे आचार्य चिडून घरी जातात. तारा अक्का विचारते काय झाले. आचार्य घडलेलं सांगतात. तारा अक्का :"पाणी पी आणि शांत हो ,उगीच माझी दिशाभूल करू नको" श्री रंग भट्ट येऊन गया ताईंचा आभार मानतात. आचार्य चिडून त्यांना व्यवहाराचा बोलायचं म्हणून घेऊन जातात .  तारा अक्का :"कसा होईल ह्याचा काहीच काळात नाही ,अजून रामाला कशी उपरती होत नाही ,स्वामीच बुद्धी देऊ देवोत त्याला ,काय ग गया मुला साठी एवढी  झुरतेस ,मग तुझी हि खंत स्वामींकडे का बोलून दाखवत नाहीस" गया वाहिनी विचार करता बसतात. 

दुसरीकडे स्वामी सदा ला नखं कापायला सांगतात. सदा :"लै उपकार झाले स्वामी तुमचे " सदा चे हात थर थर करतात , स्वामी :"अरे हात थर थर करतायत तुझे ,डोक्यावर भारअसेल तर शरीर थरथरतात बारा का ,कोणाला बसवला नाहीस ना डोक्यावर  आणि असेल तर उतरवावा लागेल ,चाल नखं काप" सदा स्वामींचे नखं कापतो आणि त्या नखाकडे पाहत असतो . स्वामी :"काय रे बघतोस का त्या नखाकडे श्रीखंड पुरी आहे का ते " सदा नाही स्वामी टाकून येतो असो सांगून घेऊन जातो . स्वामी हे बघून हसतात . 

दुसरीकडे बाळप्पा आपली शिदोरी दुसर्यांना देतात . अक्का सांगते कि रावजी काका आले होते पेढीवर त्यांना दिले . बाळप्पा चे आई सांगतात कि लहानपणापासून असाच आहे सगळं वाटून टाकायचा . "जा भागीरथी, अक्का ला जेवायला वाड " अक्का :"माई व्याज म्हणजे काय गं " भागीरथी सांगतात :"समज तुला भूक लागली आहे पण तुझ्याकडे भाकरी नाही ,तुझ्या भुकेची गरज भागविण्याकरिता मी माझ्याजवळची भाकरी तुला दिली ,पण जेव्हा तुझ्याकडे तुझ्या भाकरी येतात तेव्हा तेव्हा तू माझी भाकरी आणि एक भाकरी जास्त देशील ,ती चड भाकरी म्हणजे व्याज , जेव्हा लोकांना गरजेच्या वेळेस आपण पैसे देतो ,ती परत करताना काही आधीक रक्कम आकारली जाते ते म्हणजे व्याज ,पण तू का विचारतेस  " अक्का सांगते कि कसा ,पेढीवर रावजी काका व्याज देना जमणार नाही अडचण आहे. त्यावर बाळप्पा रावजीकाकांना आपली शिदोरी देतात "आदी घरचा सांभाळा व्याजाचा नंतर बघू "आणि खाऊन घ्या म्हणतात .

बाळप्पांचे आई त्यावर चिडचिड करतात भागीरथी ना  ,"हे काय वय आहे का विरक्ती येण्याचा ,मुलगी आहे लग्नाची , कुठलाच मोह नाही या पोराला ,पर्वा मला म्हणाला मला काही नको फक्त शिव नाम हवा ,तुझ्या नवरयाला असला भलताच सुचतंय काय सांगतेय मी कळतंय का ,मला बदल दिसायला हवा ". भागीरथी विचार करतात :"ह्यांना नक्की काय हवय कसली असं लागलीय काहीच काळात नाहीय "


दुसरीकडे बाळप्पा ना भेटायला स्वामी एक माणसाच्या वेशात येतात. बाळाप्पा शिव नामाचा जप करत असतात .स्वामी :"काय झोप लागली होती का ध्यान,कुठे हरवलाय बाळप्पा सरकार  " बाळप्पा :"नाही देवाचा नाव घेत होतो त्यामुळे " स्वामी :"काय बाळाप्पा सावकार ,माणसांना एका वेळेला एकच गोष्ट करायची , आता प्रपंच करताना थोडा परमार्थ साधावा कि " बाळप्पा :"अहो त्याचाच प्रयत्न करतोय मी ,पण मनाला एक चट्का लागून राहायला आहे माझ्या  "

 स्वामी:"अहो काय सावकार अहो सोनाऱ्यातील माणसं तुम्ही धातूला चटका लागतोय म्हणजे दागिना तयार होतोय कि " बाळप्पा :"छान वाटले तुमच्याशी बोलुन " स्वामी :"अहो आता आम्चायशीचं सूर जुळणार आहेत तुमचे , कायमचे " बाळप्पा :"बार काय काम होत का तुमचा  " स्वामी दागिना देतात आणि मोती हवा असे सांगत,पण प्रवासाला जायचा आहे मोती आता नको असा सांगतात आणि निघून जातात . बाळप्पा विचार करतात :"काय कमाल माणूस काही लिखा पडी केली  नाही ,कागद घेऊन गेला नाही  "  स्वामी बाहेर येऊन  :"आम्हाला कागदाची गरज नाही,युगा युगांची बांधिलकी आहे तुझी आमच्याशी ,जाशील कुठे ,शिव शंकर शंभो "  

No comments:

Post a Comment