स्वामी ध्यानात बसलेत . दुसरीकडे सदा विचार करत असतो :"ह्या तिलोत्तमा ला कसा समजवू ,काय कमी आहे आपल्याला " सदा तिलोत्तमा ला विचारतो ,"स्वामींची नख घेऊन काय करणार आहेस " तिलोत्तमा :"मी त्याची ताईत करून ठेवेन ,आज एक ताईत गेलं तर ,नखं असतील तर त्याची १० ताईत करता येईल " सदा :"नाही नाही असली लबाडी नाही जमायची " तिलोत्तमा:"स्वामी आपली नखं टाकूनच देतात ना ,त्यात लबाडी काहीच नाही ,पटतंय ना " सदा :"पटतंय पण " तिलोत्तमा:"आता पण बिन काही नाही ,नखं कापायची आणि मला आणून द्यायची" दुसरीकडे आचार्य आणि सुमुख चोळप्पा च्या घराबाहेर थाम्बलेलं अस्तात. आणि ठरवतात कोणाला हि स्वामींना भेटू द्याचा नाही राधा शिवाय. एक व्यक्ती स्वामींच्या दर्शनाला येतात , पण आचार्य त्यांना सांगतात :"स्वामी ध्यानात बसलेत ,तुम्ही धर्मशाळेत जावा ,उद्या सकाळी या ". तो व्यक्ती धर्मशाळेत जातो . भीमा पण स्वामींच्या दर्शनाला येतो. आचार्य असाच भीमा ला पण परत पाठवतात नाऱ्या चे वडील आजारी आहेत असा खोटा सांगून.भीमा नाऱ्या च्या वडिलांना भेटायला जातो स्वामींना ना भेटता . राधा बाई तिथे येते आणि स्वामींना जेवायला द्यायला जाते . पण स्वामी ध्यानात बसले असतात आणि राधा बाई स्वामींची वाट बघत बसते . तिथे भुजंगा येतो आणि राधा बाईला जायला सांगते. पण ती तिथून जात नाही. स्वामीं ध्यानातून उठतात. भुजंगा सांगतो कि राधा आक्कांनी जेवण बनवला आहे मी गरम करून देतो. पण राधा बाई सांगते कि ते जेवण शिळा झाला असेल मी गरम जेवण देते स्वामींना . "स्वामी जगाचं पहारा करतात तुम्ही जावा " स्वामी पण भुजंगाला परत पाठवतात. स्वामी राधा बाईंनी बनवलेलं जेवण देते . आणि जेवण झाल्यावर विषारी विदा खायला देते . स्वामी :"आमच्या करीता खास बनवला आहे वाटतं " राधा बाई घाबरून हो म्हणते. स्वामीं राधा बाईला जायला सांगतात आणि तो विडा खातात. राधा बाई विचार करते :"आता खरी मजा येणार,या विडा सांगा रात्र भी रंगणार आणि ह्या बुवाचा खरा चेहेरा सगळ्यांसमोर येणार " दुसरीकडे चंदा ला आईची आठवण येत असते. ती काळजी करते कि स्वामींना तीला भेटता येत नाही म्हणून . हरी भाऊ तिला समजावून त्याच्या मांडीवर झोपवतो.
No comments:
Post a Comment