Avoid Copy Paste

Wednesday 13 October 2021

जय जय श्री स्वामी भाग 249/ jai jai shree swami samarth ep. 252/ep.10 october/colors marathi

 --252

गावात एक नवीन गुरु वाजत गाजत येतातआणि खंडोबाला सोना अर्पण करतात . सुमुख :"अहो आचार्य सोनं " स्वामी :"जहर आहे जहर".  आचार्य गुरु बद्दल विचारतात . तो शिष्य गुरु ना भेटायला सांगतो. 

दुसरीकडे दाजीबा सरकार राणी सरकार चे पाय डब्याचे नाटक करतात. दाजीबा सरकार चे आई येऊन चिडतात आणि देवयानी बाईसाहेबाना ओरडतात :"वाड्यात नौकर कमी पडलेत का , अजून किती दिवस आजारी असणार आहेत ,एवढा करून पण आम्हाला नातवंडांचे तोंड पाहायला मिळणार नाही ,तुमच्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे". असे म्हणून निघून जातात. तिथे चंदा देवयानी बाईसाहेबांना प्रसाद घेऊन येते.पण दाजीबा सरकार तिला बाईसाहेबाना प्रसाद देऊ देत नाहीत आणि स्वतः प्रसाद घेऊन नंतर खाऊन टाकतात. 

दुसरीकडे रामाचार्य गावातल्या नवीन गुरु ला भेटायला जातात. एक शिष्य त्यांची वाट अडवतो आणि दर्शनाला उद्या यायला सांगतात.  आचार्य त्यांना दाजीबा सरकारचं खास व्यक्ती असल्याचा सांगतात. मग तो शिष्य त्यांना  थांबायला सांगूनआतमध्ये जातो. पण खूप वेळ झाल्यावर रामाचार्य स्वतः च आश्रमामध्ये जातात. आतमध्ये एक साधू ध्यानात बसलेत. पण त्या साधू हवेत तरंगत असतात . आचार्य त्यांना बघून चकित होतात . 

दुरीकडे चंदा स्वामींकडे येते. स्वामी :"आगा देवाचा प्रसाद खालला  म्हणून देव पावतो असा नाही , आपण ज्या भावनेनं प्रसाद खातो ते महत्वाचं" 

जय जय श्री स्वामी भाग 251/ jai jai shree swami samarth ep. 251/ep.10 october/colors marathi

 --251

तारा अक्का सोमवती अमावास्याला खंडोबाला अभिषेख घालायचा आठवण करून देतात. सागेलेजन तयारीला लागतात . बाळप्पा स्वामींना मनातल्या मनात :"स्वामी माझ्या योग्य काही काम असेल तर सांगा " तिथे स्वामी येऊन :"अरे हा बाळप्पा ,आणेल कि पाणी ,त्याला सवय पण आहे अणे आवड पण आहे या सेवेची " बाळप्पा स्वामींना नमस्कार करतात. स्वामी सगळ्यांना गूळ वाटतात पण बाळप्पा राहून जातात. बाळप्पा दुखी होतात. 

दुसरीकडे कृष्णप्पा स्वतःहून पाठांतर करत असतो. सगळेजण त्याचे कौतुक करतात आणि त्याला खंडोबाच्या अभिषेखला न्याचा ठरवतात आणि त्याला नवीन सदरा देतात.

दुसऱ्या दिवशीं सगळेजण तयारी करतात. राधा अक्का अभिषेख साठी दूध आणतात. चंदा आणि कृष्णप्पा दोन माळ तयार करतात एक खंडोबाला आणि एक स्वामींना.  चंदा देवासाठी गाणं म्हणते. आचार्य चीड चीड करतात आणि स्वामींना "काय रे बुवा देवा कडे पाठ करून बसलास " स्वामी :"अरे रामाचार्य रोज धर्मकृत्य करतोस त्या नावाखाली लोकांना लुबाडतोस ,अरे तू किती पण देव भक्तीचा देखावा केलास ना तरी मनातला काळ कसा लपवणार " चोळप्पा पण विशोभा खेचर यांचा उद्धरण देतात कि ते कस शंकराच्या पिंडीवर पाय टाकून बसले होते."आचार्य स्वामींसारख्या सिद्ध पुरुषाला आपल्यासारख्या सामान्य माणसाचे नियम लागू होत नाही " बाळाप्पा पण पाणी घेऊन येतात. चोळप्पा :"अहो बाळप्पा एवढा ओझं एकट्यानं का आणलात मला सांगायचं " बाळप्पा :"अहो हे प्रेमाचा ओझं आहे व्यक्त केलं कि मन हलका होतं " कालिंदी चिडून :"ह्या बुवाला हात खाली राबायला माणसंच हवी असतात वर मोबदला पण देत नाही "

राधा अक्का :"कालिंदी तुझी जीभ अडकित्ता आहे हे सगळ्यांना माहित आहे, एक अनोळखी माणूस देवकार्यात आपल्याला मदत करतो , तुझं  काय ग मध्ये मध्ये ,गप बस " आचार्य पूजेला बोलावतात. आचार्य खंडोबाला अभिषेख घालून पूजा करतात. सगळेजण :"खंडोबाच्या नावाने चांगभलं" सगळेजण हळद उधळून खंडोबाला नमस्कार करतात. बाळप्पा स्वामीना :"स्वामी ,असा वाटतंय ,सगळी नागरी जणू सोन्याची झाली" स्वामी :"सुवर्ण , आता ह्या नगरात सोन्याचाच बोलबाला होणार "

Sunday 10 October 2021

जय जय श्री स्वामी भाग 249/ jai jai shree swami samarth ep. 249/ep.10 october/colors marathi

 राधा अक्का घरी येऊन ताईत चा प्रकरण सांगतात. दुसरीकडे बाळप्पा अंघोळ करून स्वामींना भेटायला निघतात ,पण आधी शंकराची पूजा करतात.स्वामी पण चोळप्पांच्या घरातून निघतात.  बाळप्पा चोळप्पाच्या घरी येतात, चोळप्पा त्यांना गुलपाणी घ्याला सांगतात , पण बाळप्पा आधी स्वामींना भेटायला जातात आणि नंतर सविस्तर बोलू असे सांगतात. 

दुसरीकडे स्वामी सुमुख ला खडसावतात "निर्मलाला त्रास देऊ नको , ती आमची लेक आहे". असा सांगून स्वामी पुढे जातात.सुमुख घाबरून आचार्यां :"निर्मला मला काय शोभायची ,तिला ना रंग ,ना रूप , हा बुवा सांगतो म्हणून नाही बारा का". सुमुख मग चंदाला वाड्यावर यायला सांगतो. पण चंदा मला बारा वाटत नाही म्हणून सांगते. कालिंदी चिडून तिला कामाला जायला सांगते. सुमुख सांगतो देवयानी बाईसाहेब आलेत. त्यावर वाड्यावर यायला चंदा लगेच तयार होते.

दुसरीकडे भुजंग आणि नरसप्पा काळजी करतात कि गाय चारा खात नाही. 

स्वामी आल्यावर :"काय ग आमच्याकरता थांबून आहेस होय , आलो " असे म्हणून गाईला चारा खाऊ घालतात आणि सांगतात ,"आता रोज भुजंग अन नरसप्पा च्या हातानी चारा खायचा , रोज रोज तुला चारा खाऊ घालायला वेळ नाही  ". असे सांगून स्वामी परत एका झाडा खाली येऊन थांबतात. बाळप्पा स्वामींना भेटायला आल्यावर, भुजंग सांगतात ,"आता इकडे गेलेत बघा " स्वामी बाळप्पाची परीक्षा घेत आहेत का? 

Tuesday 28 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 237 "देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत""

 देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत

सगळेजण स्वामी महाराजांची पाद्य पूजा करायची तयारी करत आहेत . सगळेजण चोळप्पांच्या  भक्तीचे कौतुक करतात कि इतक्या काट्यावरून चालून हि इजा झाली नाही. चोळप्पा स्वामींची पाद्य पूजा करतात. "जय देव जय देव जय अवधूतां " राधा अक्का :"क्षमा करा स्वामी चोळप्पाच्या बाबतीत खूप चुकीचा विचार केला ,तुमच्या भक्त म्हणून तो थोर आहे " चोळप्पा :"अहो नाही नाही माझी कसली आलीय थोरवी ,जे काही केलाय ते स्वामींनी केलंय , श्री गुरुदेव दत्त " स्वामी :"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" सगळ्यांना आशीर्वाद दिला. 

तिलोत्तमा चे सासू तिला समजावतात :"स्वामींच्या नखांचा ताईत करून विकू नका ,स्वामींनी स्पष्ट इशारा दिलाय " तिलोत्तमा :"उलट स्वामींनी शगुन दिलाय ,त्या चोळप्पा भाऊजी ना काय कळतंय " निर्मला येऊन स्वामींची आणि चोळप्पा कसे काट्यावरून चालतात आणि त्यांना काहीच जखम झाली नाही . आजी :"बघितला का तिलोत्तमा ,चोळप्पा स्वामींचा लै जवळचा भक्त आहे , स्वामींच्या बोलण्याचा अर्थ त्याच्या इतका चांगला कोणीच सांगणार नाही , सुधारा नाहीतर काहीतरी संकट यायचा"

दुसरीकडं रामाचार्य आणि सुमुख परत नवीन कट कारस्थान करू लागतात आणि सदा ला जाळ्यात अडकवण्याचा सांगतात. सुमुख परत निर्मलाला "सुमुखी सुमखी ,काय विचार केला नाही का माझ्या प्रस्तावाचा " म्हणून त्रास देतो.  आचार्य चिडून सुमख ला बोलावतात. 

दुसरीकडे चंदा दाजीबा सरकार मुलं काळजी करत असते. तिथे कृष्णप्पा येऊन तिला स्वामींचे आणि बाबांचे कौतुक सांगतो . चोळप्पा :"आपला विश्वास त्या काट्यापेक्षा जास्त पाहिजे ना ,आपल्या मनामध्ये स्वामीं वरची भक्ती असेल तर तिथे भीती ला जागाच उरणार नाही " असे म्हणून दोघे जातात . चंदा विचार करते :"चोळप्पा काका तर काट्यावरून चालून गेले आणि म्या स्वामी असताना बी दाजीबा सरकारच्या बोलण्याचा विचार करत बसलेय ,मला फक्त स्वामी आणि त्यांची भक्ती याच विचारात राहिला पाहिजे  , मनांतल्या देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत"

दुसरीकडे आचार्य आणि सुमुख सदा कडे येतात. आचार्य :"मी तुझी स्मशरू करणार ,बक्कळ पैका कमावळास , स्वामींचे नखांचे ताईत करून विकलंस, त्यात मला हिस्सा हवा नाहीतर स्वामींना सांगेन" सुमुख :"त्यापेक्षा आपण दाजीबा सरकार ला सांगू म्हणजे ते त्यांना अंधार कोठडीत डांबून ठेवतील" सदा शेवटी हिस्सा द्याल तयार होतो. दुसरीकडे स्वामी :"चुकीच्या  मार्गाने पैसे गेला तर त्याला फाटे फुटणारच , हपापाचा माल गपापा ,शिव शंकर शंभो"  

Monday 27 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 235 "स्वामींनी दिली तिलोत्तमा ला विषाची पुडी "

 स्वामी चोळप्पा ला एक पुडी देतात . आणि :"चोळप्पा वेळेवर आलास ,हे त्या सदाच्या बायकोला ,तिलोत्तमा ला नेऊन दे ,विष आहे म्हणावं " सगळेजण घाबरतात. सोनबा , तारा अक्का ,नरसप्पा कोणालाच काही कळत नाही . चोळप्पा पुडी घेऊन जातात . दुसरीकडे निर्मला च्या जखमांवर आज्जी मलम लावते आणि मग तिला फुटाणे खायला बाहेर पाठवते . आणि निलोत्तमा ला बजावते ,"पुन्हयांदा जर माझ्या नातीला हात लावलास तर तू आहेस आणि मी आहे "

तिलोत्तमा :"मग तिला काळत नाही , आपलया आईला खोटं ठरवायला "  तिथे चोळप्पा येतात आणि विषाची पुडी देतात आणि :"हि पुडी स्वामींनी तिलोत्तमा वाहिनी ला द्याला सांगितलं आहे" आजी म्हणते :"तिलोत्तमा मगाशी घेत होती ना विष ,मग आता घे, स्वामीं पासून काही लपून नाही " तिलोत्तमा :"नाही मी विष घेणार नाही " पण चोळप्पांच्या संगणवरून तिलोत्तमा उघडून बघते ,तर त्यात सोन्याची नाणी असतात . आजी विचारते ह्याचा अर्थ काय घ्याचा चोळप्पा . चोळप्पा :"स्वामींना असा सुचवायचं असेल ,कि गैर मार्गाने मिळवलेला पैसे हा विष प्रमाणे असतो" दुसरीकडे झाडाखाली स्वामी :"वाह चोळप्पा ,योग्य सल्ला दिलास, सदा आम्ही तुला इशारा दिला आहे बरं"  चोळप्पा येतातं आणि घडलेलं सगळं सांगतात :"स्वामी जे काही सांगतात त्यात काहीतरी बोध असतो,त्याचा शब्दशः अर्थ घ्याचं नाही  ,तो आपण ओळखणं गरजेचं आहे ".  स्वामी सेवकर्यांना  :"कळलं का आम्ही चोळप्पा ला का  सांगितलं ,तुम्हाला जमलं असता कि तिलोत्तमा ला विष द्याला ,बेवकूफ दुसर्याबद्दल मत्सराची भावना लगेच तयार होते तुमच्या मनात ,जराही वेळ लागत नाही " स्वामी वेगाने तिथून निघून जातात आणि सगळे सेवेकरी त्यांच्या मागे मागे जातात .  स्वामी जंगलात येतात. सगळेजण गोंधळून जातात . स्वामी :"चोळ्या मगाशी हातघड्या घालायची तयारी होती ना ,काढ ते पायताण आणि चल, काट्यावर" चोळप्पा हसत हसत स्वामींच्या मागे मागे येतात . सगळेजण स्वामींना नमस्कार करतात. 

Monday 13 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 224 "आम्हाला कागदाची गरज नाही"

 --जय जय श्री स्वामी समर्थ भाग 224 "आम्हाला कागदाची गरज नाही"



बाळप्पा एका पायावर उभे राहून शिव आराधना करत असतात. त्यांचा मुलगा बंडू त्याचा ताईला :"अक्का बाबाना एक गम्मत सांगायची आहे सांगू का " ताई :"नाही बंडू ,नंतर सांग तुला माहित आहे ना,बाबा दुसरा प्रहर संपे पर्येंत शिव आराधना करणार आहेत " बंडू :"विसरलोच मी,पण बाबा आपल्याला हवे तेव्हा आपल्यासोबत नसतातच ना " ताई :"बंडू असा नाही बोलायचं ,तो देव बाप्पा आहे ना ,तो सगळं ऐकतो "  बंडू :"देव बाप्पा चुकला असेल तर क्षमा कर या बंडूला" 

दुसरीकडे आचार्य चिडून घरी जातात. तारा अक्का विचारते काय झाले. आचार्य घडलेलं सांगतात. तारा अक्का :"पाणी पी आणि शांत हो ,उगीच माझी दिशाभूल करू नको" श्री रंग भट्ट येऊन गया ताईंचा आभार मानतात. आचार्य चिडून त्यांना व्यवहाराचा बोलायचं म्हणून घेऊन जातात .  तारा अक्का :"कसा होईल ह्याचा काहीच काळात नाही ,अजून रामाला कशी उपरती होत नाही ,स्वामीच बुद्धी देऊ देवोत त्याला ,काय ग गया मुला साठी एवढी  झुरतेस ,मग तुझी हि खंत स्वामींकडे का बोलून दाखवत नाहीस" गया वाहिनी विचार करता बसतात. 

दुसरीकडे स्वामी सदा ला नखं कापायला सांगतात. सदा :"लै उपकार झाले स्वामी तुमचे " सदा चे हात थर थर करतात , स्वामी :"अरे हात थर थर करतायत तुझे ,डोक्यावर भारअसेल तर शरीर थरथरतात बारा का ,कोणाला बसवला नाहीस ना डोक्यावर  आणि असेल तर उतरवावा लागेल ,चाल नखं काप" सदा स्वामींचे नखं कापतो आणि त्या नखाकडे पाहत असतो . स्वामी :"काय रे बघतोस का त्या नखाकडे श्रीखंड पुरी आहे का ते " सदा नाही स्वामी टाकून येतो असो सांगून घेऊन जातो . स्वामी हे बघून हसतात . 

दुसरीकडे बाळप्पा आपली शिदोरी दुसर्यांना देतात . अक्का सांगते कि रावजी काका आले होते पेढीवर त्यांना दिले . बाळप्पा चे आई सांगतात कि लहानपणापासून असाच आहे सगळं वाटून टाकायचा . "जा भागीरथी, अक्का ला जेवायला वाड " अक्का :"माई व्याज म्हणजे काय गं " भागीरथी सांगतात :"समज तुला भूक लागली आहे पण तुझ्याकडे भाकरी नाही ,तुझ्या भुकेची गरज भागविण्याकरिता मी माझ्याजवळची भाकरी तुला दिली ,पण जेव्हा तुझ्याकडे तुझ्या भाकरी येतात तेव्हा तेव्हा तू माझी भाकरी आणि एक भाकरी जास्त देशील ,ती चड भाकरी म्हणजे व्याज , जेव्हा लोकांना गरजेच्या वेळेस आपण पैसे देतो ,ती परत करताना काही आधीक रक्कम आकारली जाते ते म्हणजे व्याज ,पण तू का विचारतेस  " अक्का सांगते कि कसा ,पेढीवर रावजी काका व्याज देना जमणार नाही अडचण आहे. त्यावर बाळप्पा रावजीकाकांना आपली शिदोरी देतात "आदी घरचा सांभाळा व्याजाचा नंतर बघू "आणि खाऊन घ्या म्हणतात .

बाळप्पांचे आई त्यावर चिडचिड करतात भागीरथी ना  ,"हे काय वय आहे का विरक्ती येण्याचा ,मुलगी आहे लग्नाची , कुठलाच मोह नाही या पोराला ,पर्वा मला म्हणाला मला काही नको फक्त शिव नाम हवा ,तुझ्या नवरयाला असला भलताच सुचतंय काय सांगतेय मी कळतंय का ,मला बदल दिसायला हवा ". भागीरथी विचार करतात :"ह्यांना नक्की काय हवय कसली असं लागलीय काहीच काळात नाहीय "


दुसरीकडे बाळप्पा ना भेटायला स्वामी एक माणसाच्या वेशात येतात. बाळाप्पा शिव नामाचा जप करत असतात .स्वामी :"काय झोप लागली होती का ध्यान,कुठे हरवलाय बाळप्पा सरकार  " बाळप्पा :"नाही देवाचा नाव घेत होतो त्यामुळे " स्वामी :"काय बाळाप्पा सावकार ,माणसांना एका वेळेला एकच गोष्ट करायची , आता प्रपंच करताना थोडा परमार्थ साधावा कि " बाळप्पा :"अहो त्याचाच प्रयत्न करतोय मी ,पण मनाला एक चट्का लागून राहायला आहे माझ्या  "

 स्वामी:"अहो काय सावकार अहो सोनाऱ्यातील माणसं तुम्ही धातूला चटका लागतोय म्हणजे दागिना तयार होतोय कि " बाळप्पा :"छान वाटले तुमच्याशी बोलुन " स्वामी :"अहो आता आम्चायशीचं सूर जुळणार आहेत तुमचे , कायमचे " बाळप्पा :"बार काय काम होत का तुमचा  " स्वामी दागिना देतात आणि मोती हवा असे सांगत,पण प्रवासाला जायचा आहे मोती आता नको असा सांगतात आणि निघून जातात . बाळप्पा विचार करतात :"काय कमाल माणूस काही लिखा पडी केली  नाही ,कागद घेऊन गेला नाही  "  स्वामी बाहेर येऊन  :"आम्हाला कागदाची गरज नाही,युगा युगांची बांधिलकी आहे तुझी आमच्याशी ,जाशील कुठे ,शिव शंकर शंभो "  

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 223. promo ":"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"

 जय जय श्री स्वामी समर्थ भाग 223. promo ":"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"

आचार्य आणि  श्री दत्त गुरु भक्त दोघे जण स्वामींकडे येतात . नारसप्पा:"हा आचार्य इथे कशाला आला म्हणायचं आता. " आचार्य :"हाच तो बुवा दिसतंय का ह्यात काय विशेष" तो व्यक्ती :"श्री गुरुदेव दत्त " असे म्हणून स्वामींना नमस्कार करतो  . स्वामी चिडून :"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"

आचार्य:"ह्याची मानसिकता ओळखणं कठीणच ,जाऊदे आपण आपल्या व्यव्हाराचं बोलू ,या " चोळप्पा:"आचार्य आमच्याच घरी  येऊन आमच्याच स्वामीं विषयी एक हि उना दुणा मी ऐकून घेणार नाही  " स्वामी दत्त गुरु भक्त व्यक्ती ला नमस्कार करून :"नमस्कार आपली ओळख "  तो व्यक्ती :"मी श्रीरंग भट्ट" चोळप्पा :"मी चोळप्पा ,स्वामी सेवक ,स्वामींना जे सांगायचं ते जर आपल्याला काळाला तर पुढचा सगळं सोप्पं होऊन जातो" मग अचानक श्रीरंग भट्ट स्वामींचे पाय धरतो :"स्वामी मला क्षमा करा मी आपला देणं द्याचा विसरलो " आचार्य :"अहो डोकं फिरल्या का काय तुमचं ,या बुवाला तुम्ही पह्लीयांदा भेटताय ना ,मग तुम्ही याचा असा काय देना लागताय"  श्रीरंग भट्ट :"नाही मी काही वर्षांपूर्वी , पोटशुळाच्या ब्याधीने गांजून गेल्तो ,माझं पोटशूळ जाऊदे मी सेवा रुपयाचे पेढे ठेवेन ,पण माझा पोटविकार बारा झाला पण मी नवसाचा विसरलो ,स्वामी तुम्ही मला नवसाची आठवण करून दिली ,स्वामी मला क्षमा करा ,मी गरज सरो आणि वैद्य मारो असा वागलो, स्वामी आपण साक्षात दत्तस्वरूप आहेत , आता मी नवस आपल्या चरणाशीच फेडतो ,श्री गुरुदेव दत्त  " स्वामी :"शिव शंकर शंभो"

दुसरीकडे कृष्णप्पा आईला मदत करत असतो आणि देवाचा नाव घेतो . तो सांगतो :""स्वामी आजोबानी सांगितलं आहे ,सगळ्यांशी चांगला वागायचं ,देवाचा नाव घ्याचा ,चांगला वागलास तर मी तुला पेढा देईन , मी तुला एक पेडा देईन ,मला अर्धी वाटी खीर दे" राधा अक्का खीर नाही देत. कृष्णप्पा चिडून बाहेर येतो. बाहेर श्रीरंग भट स्वामींना पेढ्याचा नवस पूर्ण करतात.स्वामी ते पेढे कृष्णप्पा ला देतात . कृष्णप्पा सगळ्यांना पेढे वाटतो . आचार्य चिडून निघून जातात . श्रीरंग भट्ट:"स्वामी आपला आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या " स्वामी :"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "

दुसऱ्या दिवशी स्वामी चोळप्पाना नक्षत्र विचारतात. चोळप्पा स्वाती नक्षत्र आहे असा सांगतात . स्वामी :"चोळ्या ,स्वातीचा एक थेंब ह्या शिंपल्यावर पडल्यावर ह्या शिम्पल्याचा मोती होणार,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " आणि तसाच होते .स्वामी :"चोळ्या आमचा मोती तयार व्हायला सुरवात झाली "

दुसरीकडे बाळप्पा दोन पाण्याची मडकं घेऊन गावात येतात  त्यांच्या पायातून रक्त येत आहे . गावकरी त्यांना नमस्कार करतात . एक गावकरी :"काही झाला तरी नियम चुकत नाही बाळाप्पांचा " दुसरा व्यक्ती :"इतके नौकर चाकर असताना बाळाप्पा इतके कष्ट का घेतात,अपार शिव भक्ती ,शिव शंभोच्या अभिषेकासाठी लांब नदीवर जाऊन पाणी आणतात " घरी जाऊन बाळप्पा शंकराला ला अभिषेक करतात त्यांची मुलगी फुलं आणते आणि बायको बेलाचे पण आणते   

दुसरीकडे कृष्णप्पा स्वामींना विचारतो :"स्वामी आजोबा मोती तयार झाला असेल ना आता " स्वामी :"इतक्यात कुठे रे बाळा ,अरे आता कुठे स्वातीचा थेम्ब पडलाय ,मोतीने आकार घायला सुरवात केली आहे अजून तर बराच वेळ आहे आणि आकार घेताना बराच सोसावा लागतं आणि आकार घेताना बराच सोसावा लागत "